Ajit Pawar : आम्ही आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित ठेवू याची काळजी कोणी करू नये. तसेच पुणे जिल्ह्यातील माझ्या दोन्ही आमदारांवर कुठला ही दबाव नाही. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जयंत पाटील अमित शहा भेट, मुख्यमंत्री होणार का? संजय राऊतांची टीका यासारख्या विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. ते पत्रकारांशई संवाद साधत होते. त्यानंतर लगेचच राऊतांवर अजित पवारांनी देखील पलटवार केला आहे. (Ajit Pawar Talk on Sanjay Raut, Jaynat Patil, Amit Shah in Pune with Press )
…तर कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण होवो; CM पदासाठी पाटोलेंचे ‘भद्रा मारुती’ कडे साकडे
आम्ही आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित ठेवू
पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील आमच्या दोन्ही आमदारावर कुठला ही दबाव नाही. आम्ही आमचा पक्ष अन् परिवार व्यवस्थित ठेवू याची काळजी कोणी करू नये. जयंत पाटील अमित शाह भेट हे धादांत खोटं आहे. बातम्या बिन बुडाचा कशा करता. मी देखील शाह यांना भेटलो नव्हतो. मी सत्तेत प्रवेश केला नंतर त्यांना भेटलो. आता जयंत पाटील यांच्याबद्दल सांगायला मी मन कवडा नाही. तर मुख्यमंत्री होणार का? असं विचारलं असता पवार म्हणाले, आता मी स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? सारखं काय तेच तेच.
‘काम कमी अन् गवगवाचं जास्त; जाहिरातबाजीवरून सुजय विखेंची रोहित पवारांना डिवचलं
अनुभवातून माणसाची मतं बदलतात
तर संजय राऊतांच्या अमित शाह यांनी केलेल्या अजित पवारांच्या कौतुकावरील टीकेवर अजित पवार म्हणाले, तुम्हाला उद्योग नाही. कुणी कौतुक केलं की, विचारता तुम्हाला काय वाटत? कुणी टीका केली की, विचारता तुम्हाला काय वाटत? पण भाजपसोबत जाण्याची निर्णय मी लोकप्रतिनिधी यांची कामे होण्यासाठी घेतला आहे. कारण मोदी यांच्यासारख्या मजबूत नेता देशाला मिळाला आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. तसेच अगोदर माझी भूमिका आणि आताच्या भूमिकेवरून माझ्यावर टीका केली. मात्र माणसाची अनुभवातून विविध मतं होऊ शकतात. असं यावेळी पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले, माझ्याकडे अर्थ आहे, वळसे पाटील सहकार आहे. 2 दिवस अमित शहा हे पुण्यात होते. त्यावेळी साखर कारखाने संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज साखर संकुलात अजित पवार आणि वळसे पाटलांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीत इथेनॉल, वित्त विभागा संदर्भात चर्चा झाली. अशी माहिती यावेळी पवारांनी दिली. यावेळी साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारही उपस्थित होते.
तसेच आपल्याला विमानतळ हे अंतराष्ट्रीय करायचे आहे. पुण्यात प्रकल्प आहेत मेट्रो, वाघोली रोड असेल, चांदणी चौक असेल असे अनेक प्रकल्प करायचे आहेत. २०२०-२२ वर्षात असे निर्णय होत नव्हते. तसेच महायुती संदर्भात आमची थोडीशी काल चर्चा झाली. मुख्यमंत्री, अमित भाई, उपमुख्यमंत्री अशी चर्चा आमच्या झाली पण जास्त चर्चा विविध विकास प्रकल्प संदर्भात झाली. असं पवार म्हणाले.