Video : अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम

या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे.

Video : अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम

Video : अजित पवारांच्या निकटवर्तीयांने नागरिकाला उचलून आपटलं; डोक्याला व गुडघ्याला जखम

Baburao Chandere Assaults a Citizen : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय (Baburao Chandere) बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.

जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, माझी राजकीय वाढ होऊ न देण्यात

या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे. जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये विजय रौधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली आहे. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार करण्यात आला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. याबाबत पोलीस तक्रार देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

Exit mobile version