Ambegaon Election : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकम राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात

Ambegaon Election :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. आंबेगाव राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षात प्रथमच उभी फूट पडली आहे. गेली 35 वर्ष राष्ट्रवादी सोबत असलेले मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

Ambegaon Election :  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी एकला चलोचा नारा दिला आहे. आंबेगाव राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीमुळे या पक्षात प्रथमच उभी फूट पडली आहे. गेली 35 वर्ष राष्ट्रवादी सोबत असलेले मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना मंचर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली त्यामुळे ते अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात मैदानांत उतरले आहेत.निकम म्हणता मी वळसे पाटील यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष पक्षासाठी काम केले. पक्षाने देखील मला अनेक मोठं मोठी पदे दिली. परंतु आता पक्षात अनेक दादा, मामा, काका आलेत त्यामुळे पक्षाला माझी गरज राहिलेली नाही त्यामुळे त्यानी मला डावलले.

जरी मी पक्षाच्या विरोधात निवडणुकीच्या अपक्ष लढत असलो तरी मी ही निवडणूक दिली वळसे पाटील यांचा फोटो वापरून लढवणार आहे. कारण ते माझे श्रद्धास्थान आहे. निकम त्यांच्या प्रचार सभेत बोलत होते. मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्याने ते अपक्ष लढत असल्यामुळे येथे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आहे. देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिल्यामुळे आंबेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथमच या निवडणुकीत बंडाला सामोरे जावे लागणार आहे.

अपघातस्थळी सुप्रिया सुळेंची भेट, जखमींची विचारपूस

उमेदवारी नाकारल्यानंतरही ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे,’ असे निकम यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी सहभागी होतो. पण मलाच पक्षाने उमेदवारी न दिल्याने मानसिक धक्का बसला आहे.

Satyajeet Tambe : हॉल तिकीट लिक होणं अतिशय गंभीर बाब, कठोर कारवाई करा…

मी १९९० पासून आतापर्यंत निष्ठेने काम केले आहे. देशातील पहिली डिजिटल बाजार समिती केली. गेली सहा वर्ष शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून देण्यासाठी तसेच शेती मालाला निवारा उपलब्ध होण्यासाठी काम केले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समवेत चर्चाही केली. त्यांना मी सांगितले होते की मी माघार घेणार नाही. त्यावर पाटील मला म्हणाले ठीक आहे कळवतो तुम्हाला. पण नंतर त्यांनी आणि पक्षानेही माझ्याशी संपर्क केला नाही, असे देवदत्त निकम यांनी सांगितलं.

 

 

Exit mobile version