Download App

बॅलन्सशीट तपासू नका ती संघ स्वयंसेवकांची बँक; जनता सहकारी बँकेची शाहंना खात्री

Amit Shah यांनी पुण्यामध्ये जनता सहकारी बँकेच्या बँकेच्या कारभाराचे कौतुक करत संघाशी नाते असल्याने त्यांचा कारभार पारदर्शक असल्याचं म्हटलं.

  • Written By: Last Updated:

Amit Shah on Janata sahkari Bank in Pune : आज केंद्रिय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यामध्ये जनता सहकारी बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी या बॅंकेच्या कारभाराचे कौतुक करत संघाशी नाते असल्याने त्यांचा कारभार पारदर्शक असल्याचं म्हटलं.

Video : सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत भारताचं, लाहोरच्या मैदानात पाकिस्तानची पुरती फजिती

शाह म्हणाले की, जेव्हा सहकार मंत्र्यांना जेव्हा कोणतीही सहकारी बॅंक निमंत्रित करते. तेव्हा सहकार मंत्रालय सर्वात अगोदर त्या बॅंकेचे बॅलन्सशीट तपासते. की सहकार मंत्र्यांनी त्या बॅंकेच्या कार्यक्रमात जायला हवं किंवा नाही. जेव्हा सेक्रेटरीने मला विचारलं तुम्ही या जनता सहकारी बॅंकेच्या कार्यक्रमाला जात आहात का? तेव्हा मी त्यांना म्हटलो की, या बॅंकेची तपासणी करू नका कारण ही बॅंक संघाच्या स्वयंसेवकांनी बनवलेली बॅंक आहे इथे बॅलन्सशीट चांगलेच असते.

विमानात तुटलेली खुर्ची…केंद्रीय मंत्र्यांचा एअर इंडियावर संताप, कॉंग्रेसनेही सत्ताधाऱ्यांना घेरलं

हा विश्वास जनता सहकारी बॅंकेने कमावला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. संघातून आलेले मोरोपंत पिंगळे यांनी या बॅंकेची स्थापना केली. त्यांनी कायम लोकांसाठी जीवन जगले. त्यांचा आणि माझा संपर्क केवळ चार तासांचा होता. त्यांना मी अहमदाबादहून भावनगरला जाताना भेटलो. त्यावेळी त्यांनी नव्यानेच स्वयंसेवक झालेल्या माझ्यासारख्या तरूणाला मार्गदर्शन केले.

समुद्रात जाणं आलं अंगलट! तारकर्ली समुद्रात पुण्याचे पाच जण बुडाले, दोघांचा मृत्यू

1949 साली मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेने जनता सहकारी बँकेची स्थापना झाली. या बँकेने 75 वर्षे पूर्ण करून व्यवसायाचा 15000 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या यशस्वी कालावधीमध्ये बँकेसोबत असणाऱ्या सर्व हितचिंतकांचे ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते.

follow us