पुणे : आता सहकार क्षेत्रात कोणीही पुतण्या-भावाला नोकरीला लावू शकणार नसल्याचा अप्रत्यक्ष टोला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लगावला आहे. अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये सहकार विभागाच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. (Amit shah said Now no one will be able to employ a nephew or brother)
https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ
पुढे बोलतांना ते म्हणाले, देश एका बाजूला आहे, अन् महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण, देशात 1555 मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी आहेत. त्यातील तब्बल 42 टक्के संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राचं सहकारातील योगदान मोठं आहे. खरंतर सहकार क्षेज्ञ पारदर्शकतेशिवाय चालू शकत नाही. 9 वर्षामध्ये मोदींनी लोकांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. 60 वर्षापासून लोकांची जी स्वप्ने होती ती मोदींनी पूर्ण केली. आता मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.
मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे; भाजपसोबत जाण्याचा दावा जयंत पाटलांनी खोडला
सहकार विभागाचे सचिव आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन हा कायदा अत्यंत कमी कालावधीत लागू केला. हा कायदा 2 तारखेला तयार झाला. आणि राष्ट्रपतींची सही होऊन 4 तारखेला लागू झाला. ते म्हणाले, बोर्ड चालवण्याच्या नियमांत मोठे बदल केले. मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह कायद्यांतर्गत निवडणूक प्रणालीमध्ये सुधारणा, को-ऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, व्यवसायात सुलभता आणि स्वतंत्र निवडणूक आयोगाची नेमण्यात आला आहे. त्यामुळं आता कोणीही पुतण्या-भाावाला नोकरीला लावू शकणार नाही, अशा शब्दात अमित शाह यांनी सहकारातील नेत्यांना डिवचलं.
सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोपवण्यात आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तक्रारीही करता येणार आहेत. सहकारी संस्थांचे कार्यालय संगणीकृत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सहकाराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम करू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.