Download App

Amol Kolhe यांनी कट्टर प्रतिस्पर्धी अक्षय आढळराव यांना ‘का’ दिल्या शुभेच्छा!

  • Written By: Last Updated:

पुणे : अक्षय शिवाजीराव आढळराव यांच्यासारखा तरूण उद्योजक निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. ”टर्री” हा सिनेमा तरूणाईला सकारात्मक प्रेरणा देणारा, सामाजिक भान जपणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त करत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपले कट्टर प्रतिस्पर्धी अक्षय आढळराव-पाटील यांना शुभेच्छा  दिल्या.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन वेळा पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्त्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे चिरंजीव अक्षय आढळराव-पाटील हे चित्रपट क्षेत्रात निर्माता म्हणून पदार्पण करत असल्याने त्यांच्या निर्माता म्हणून येणाऱ्या पहिल्याच ”टर्री” या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. ”टर्री” या सिनेमाचे पोस्टर त्यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून शेअर करत शुभेच्छा दिल्या.

Tags

follow us