Download App

‘…आणि म्हणून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला’; धंगेकरांनी सांगितलं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासीक असा दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार मतांनी पराभव केला. कसब्यात भाजपला (BJP) बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांच्या 28 वर्षांच्या जुन्या गडाला सुरूंग लावण्यास महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत. धंगेकर यांचे कोणीही पुर्वज राजकारणात नसताना भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्यात त्यांनी बाजी मारल्याने त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश (Congress Joining) का केला, याचं कारण सांगितलं.

धंगेकर यांनी सांगितल की, मी पूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, थोड्या फरकाने माझा पराभव झाला होता. एकदा पराभव झाल्यावर अनेक उमेदवार नाराज होतात. आणि पुढं काम करत नाही. पण मी जिद्द ठेवली होती की, आपल्याला आमदार व्हायचं आहे. त्यासाठी मी मागच्या महानगरपालिकेला कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा मला अनेकांनी विचारलं की, कॉंग्रेसची लोक कॉंग्रेसला सोडून जात आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही कॉंग्रेसमध्ये प्रवेश का करत आहात? खरं सांगायचं तर मला तेव्हा जाणवलं होत की, मला आमदार व्हायचं असेल तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे. कॉंग्रेसशिवाय, मी आमदार होऊ शकत नाही. त्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं धंगेकरांनी सांगितलं.

Sanjay Raut : निवडणूक आयोगाचा निर्णय कागदावरच राहणार… 

दरम्यान, धंगेकरांनी सुरुवातीला 10 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. मनसेचे नगरसेवक म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केलं. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी होते. 2009 मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या वेळी त्यांचा अवघ्या 7 हजार मतांनी मराभव झाला. त्या नंतर 2014 मध्ये त्यांनी कसबा पेठेतून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. नरेंद्र मोदी यांची मोठी लाट असतांनाही त्यांनी कडवी झुंज दिली होती. मात्र, त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळं मधल्या काळात धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

 

 

Tags

follow us