Sanjay Raut : निवडणूक आयोगाचा निर्णय कागदावरच राहणार…
मुंबई : निवडणूक आयोगाचा कागदावरचा निर्णय कागदावरच राहणार असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केलीय. संजय राऊत आज मुंबईतील पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. यावेळी आज खेडमध्ये होणाऱ्या सभेबाबतही त्यांनी माहिती दिलीय.
संजय राऊत पुढे बोलतान म्हणाले, ज्यांना जायचं होतं ते गेले, आता निष्ठावान शिवसैनिक आहेत. ते गेले तरीही शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी असल्याचं ठामपणे संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.
आधी शिवसेना, नंतर मनसेलाही रामराम, आता धंगेकर कॉंग्रेसही सोडणार का? वाचा काय म्हणाले धंगेकर?
तसेच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नाव आणि चिन्ह दिलं पण त्यांना शिवसैनिक दिले नाहीत. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही. त्यामुळे जे शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांच्या जाण्याने शिवसेनेवर काहीच परिणाम झाला नसल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
दर 4-5 वर्षांनी सेवेची संधी द्या म्हणणारे पुढे गायब; मोहन भागवतांनी घेतला राजकीय नेत्यांचा समाचार
निवडणूक आयोगाचा कागदावरचा निर्णय कागदावरच राहणार असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
ईडी भाजप मंत्र्यांवर नाही तर फक्त विरोधकांवरच कारवाई करते, सिब्बलांचा केंद्रावर निशाणा
शिवसेनेच्या वाढीमध्ये कोकणाचं मोठं योगदान असून कोकणातल्या जनतेचं बाळासाहेबांवर प्रेम आणि श्रद्धा दाखवलीय. राष्ट्रवादीतले अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत,
ते मुळचे शिवसैनिकच खेडची जागा जिंकण्यासाठी त्या कार्यकर्त्यांचा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचा चांगलाच वाद पेटल्याचं दिसून येतंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा घेत आहेत.