आधी शिवसेना, नंतर मनसेलाही रामराम, आता धंगेकर कॉंग्रेसही सोडणार का? वाचा काय म्हणाले धंगेकर?
पुणे : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला (BJP)मोठा झटका बसला आहे. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल 28 वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, एका वृत्त वाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी आता कधी कॉंग्रेस सोडणार नाही, असं सांगितलं.
रवींद्र धंगेकर हे आधी 10 वर्षे कट्टर शिवसैनिक होते. त्यानंतर मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याकाळात त्यांनी कसब्यामध्ये बरीचं विकासकामं केली. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे.
दरम्यान, आधी शिवसेना, नंतर मनसे सोडून तुम्ही कॉंग्रेमध्ये प्रवेश केला. आता तुम्ही कॉंग्रेससही सोडणार का? असा प्रश्न विचारला असता धंगेकरांनी सांगितलं की, नाही, आता कॉंग्रेस सोडणार नाही. कॉंग्रेस सर्वसमावेशक आणि विचाराचा पक्ष आहे. लहानवयात शिवसेनेत गेलो. तिथं मानसन्मान मिळाला. त्यानंतर मनसेते गेलो. तिथंही चांगली वागणूक मिळाली. नंतर कॉंग्रेसमध्ये गेलो. तिथंही माझ्यावर विश्वास टाकून कॉंग्रसने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला आमदारकीची उमेदवारी दिली. हे काही कमी नाही. कॉंग्रेसचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, त्यामुळे आता कॉंग्रेस सोडणार नाही, असं धंगेकरांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांचे आभार मानले.
Uddhav Thackeray : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा; तोफ कुणावर धडाडणार ?