Download App

परमवीर सिंह यांच्याकडून अदृश्य शक्तीचा वापर, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप…

परमवीर सिंह यांचा अदृश्य शक्तीने वापर केला, असा गंभीर आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी आज पुण्यातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

MI vs SRH : हैदराबादवर विजय मिळवत मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, कॅमेरून ग्रीनचे शानदार शतक

अनिल देशमुख म्हणाले, मला खोट्या गुन्हामध्ये गोवण्यात आलं. सर्व पुरावे परमवीर सिंह यांच्याविरोधात होते तरीही मला 14 महिने तुरुंगात रहावं लागलं आहे. पण न्यायालयाने मला न्याय दिला असून राज्य सरकार परमवीर सिंह यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

‘मी नाखूश माझ्या घरी येऊ नका’, जिंकल्यानंतरही शिवकुमारांचे अजब बोल

तसेच १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर असलेले अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन ठेवण्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन प्रकरणात परमवीर सिंह यांची बदली केली होती. निलंबित केलं होतं. काही राजकीय शक्तींनी त्यांचा वापर करून घेतला, असाही आरोप त्यांनी केला आहे.

Prakash Ambedkar : सरकारला ‘ही’ भीती वाटत असल्यानं दोन हजारच्या नोटबंदीचा निर्णय

मला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं. माझ्यावर आरोप झाले, कोर्टात त्याचे पुरावे सादर झाले नाहीत. माझ्यावर १०० कोटीचा आरोप पुढे १ कोटी ७१ लाखांवर आला. त्यानंतर कोर्टात त्याचे पुरावे पण नव्हते. परमवीर सिंह आतापर्यंत निलंबित होते. परमवीर सिंह हे चांदिवाल आयोगासमोर हजर झाले नाही. ७ महिने ते फरार होते, असेही देशमुख म्हणाले.

दरम्यान, परमवीर सिंह यांनी माझ्या विरोधात पुरावे सादर करायला हवे होते. मात्र, कुठलेही पुरावे नाहीत, असे प्रतिज्ञापत्र त्यांनी न्यायालयाला दिले आहे. परमवीर सिंह यांच्याबाबत कॅटने एकतर्फी निर्णय घेऊन त्यांचे निलंबन मागे घेतलं. आता पुढे काय करायचे या संदर्भात आम्ही कायदेतज्ञ यांच्याशी बोलत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us