Download App

Video : पंकजांविरोधात मला सुपारी देण्याचा प्रयत्न; धनंजय मुंडेंचं नवीन कांड बाहेर काढत दमानियांचे गौप्यस्फोट

हाच राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे

  • Written By: Last Updated:

Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे पाच वर्षापूर्वी तेजस ठक्कर नावाच्या माणसाला सोबत घेऊन आले होते. त्यावेळी त्यांच्याकडं कागदांचा मोठा गठ्ठा होता. त्यामधून मी पंकजा मुंडे यांचा विषय मांडावा असा आग्रह त्यांनी केला. मात्र, मी धनंजय मुंडे यांना सांगितल की मी असं कुणी काही दिलेल्या कागदांवर मी काम करत नाही. (Munde) दरम्यान, मी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या अनेक प्रकरणांवर भाष्य केलं त्यावेळी एका टीव्ही चर्चेमध्ये राजेंद्र घनवट यांचं नाव मी घेतलं. ते नाव घेतल्यानंतर अनेक शेतकरी माझ्याकडं आले. त्यांनी सांगितल की या घनवट या व्यक्तीने आमचे मोठा छळ केला आहे. हाच राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचा व्यक्ती आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा घनवट यांच्यामुळं अडचणीत येण्याची शक्यता आहे.

घनवट अन् धनंजय मुंडे पार्टनर

या सगळ्या प्रकरणात 11 शेतकऱ्यांना त्रास दिला आहे. एकाची 20 कोटींची जमीन होती. त्याचा 8 लाखात व्यवहार झाला. बीड मधल्या शेतकऱ्यांचा राजेंद्र घनवट यांच्याकडून छळ होत असल्याचा आरोप अंजली दमानियांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे चार वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर यांच्या सोबत आले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते. यावेळी राजेंद्र घनवटही त्यांच्यासोबत होते. धनंजय मुंडे यांच्याबरोबर जवळ असलेले राजेंद्र घनवट आहेत असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

बिश्नोई गँगकडून मला संपवण्याचा रचला डाव; भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. या दोघांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्रास दिलाय. जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. संजय चव्हाण यांच्या नावावर पॉवर ऑफ एटरनी घेतले जातात त्याचा चुकीचा वापर केला जातो. बी फॉर्म घेतला जातो. 2004 पासून हे सर्व काही सुरू आहे. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जातं जिवंतांना मयत केलं आणि व्यवहार केले. यांच्या मागे थेट धनंजय मुंडेंसारखे राजकारणी आहेत. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत असा आरोप दमानियांनी केला. या सगळ्या प्रकरणाचे पुरावे मी चंद्रशेखर बावनकुळेंना देणार आहे. यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं त्या म्हणाल्या.

आता वाटतं मेलेलं बरं

आम्ही 2008 पासून न्याय मागण्यासाठी फिरतोय. न्यायासाठी आता अंजलीताईंकडे आलो आहोत. तालुक्यात राजेंद्र घनवट यांची मोठी दहशत आहे. आमच्या घरातील आठ भावंडांवर गुन्हा दाखल केलाय. धनंजय मुंडे यांनी चाकण पोलीस स्थानकात फोन करत आमच्यावर गुन्हा दाखल करा असं सांगितलं. मी वयाच्या नवव्या वर्षी पायात घुंगरू बांधून भिक मागितली. असं वाटतं मेलेलं बरं. आम्हाला अनेक चकरा न्यायालयात पोलिस स्थानकात मारायला लावल्या. ही सगळी लोकं पोपट घनवट आणि त्यांचा मुलगा यांची लोक आहेत. तेच जमिनी घेतात आणि पुन्हा पोपट घनवट त्या जमिनी स्वतःच्या नावावर करतात. असे मीरा सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .मीरा सोनवणे यांच्या घरातील कर्ता पुरुष 1997 ला वारला .मात्र 2006 मध्ये कागदपत्रांवर त्याला जिवंत दाखवले आणि जमिनीचा व्यवहार करण्यात आला आहे .

बंदूकीच्या धाकानं सही करायला लावली

रखमा सोनवणे सांगतात माझा नवरा भोळा होता .घाबरून मेला .नवरा गेला आणि त्यात आता जमिनीसाठी मी देखील जाणार .राजेंद्र सोनवणे यांनी सांगितलं ,माझ्या वडिलांना अटॅक आला .मला नंतर फोन आला आणि सांगण्यात आलं जमीन विकली आहे सही कर .बंदूक वगैरे आणत बॉडीगार्डने सांगितलं सही कर .नंतर नोटीस पाठवली .मग मी पण नोटेस पाठवली .आमच्याच जमिनीला कंपाउंड बांधला आहे .आम्हाला आमच्याच शेतात जाऊ दिलं जात नाही .एवढं सगळं झाल्यानंतर आम्हाला तुरुंगात पाठवलं असा आरोप राजेंद्र सोनवणे या शेतकऱ्याने केलाय असंही त्या म्हणाल्या आहेत.

 

follow us