Download App

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ!, अण्णा हजारेंकडून आव्हाडांना कायदेशीर नोटीस

  • Written By: Last Updated:

Anna Hazare legal Notice To  Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी X (ट्विटर) वर पोस्ट शेअर करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सडकून टीका केली होती. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशी टीका आव्हाडांनी केला होती. या टीकेला उत्तर देताना अण्णा हजारेंनी (Anna Hazare) कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. अखेर आज अण्णा हजारेंनी आव्हाडांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळं आव्हाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 162 जागांची भरती, थेट मुलाखातद्वारे होणार निवड 

काँग्रेस सरकारच्या काळात रामलीला मैदानावर धरणे देणाऱ्या अण्णांनी देशात आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यापासून एकही आंदोल केलं नाही. हाच धागा पकडून तीन दिवसांपूर्वी आव्हाड यांनी अण्णा हजारेंवर एक पोस्ट लिहिली. त्यांनी अण्णा हजारेंचा एक फोटो शेअर करत जोरदार टीकी कली होती.

आव्हाडांची नेमकी टीका काय?
या माणसाने देशाचं वाटोळं केलं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशी खोचक टीका आव्हाडांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देतांना हजारेंनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. अण्णा हजारे म्हणाले होते की, माझ्यामुळे देशातील नागरिकांचं भलं झालं. माझ्या आंदोलनामुळे चांगले कायदे मिळाले. माझ्या आंदोलनामुळे अनेकांना घरीही बसावे लागले, हे नाकारता येत नाही, असं म्हणाले होते.

दरम्यान, या प्रकरणी अण्णा हजारे यांनी आव्हाडांना नोटीस पाठवली आहे. आव्हाडांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी आणि अब्रुनुकसानाची गुन्हा दाखल करण्यचाा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी त्यांच्या वकिलामार्फत आव्हाड यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे.

सध्या राजकारणातील घडामोडींमुळं वातावरण गढूळ झालं आहे. हजारेंचा काही संबंध नसतांना त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर आव्हाड यांनी प्रसारित केला. त्यांनी जाणीवपूर्वक बदनामा केली. त्यामुळं त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. संबंधित नोटीशीची प्रत माहितीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शऱद पवारांनाही पाठवण्यात आली,असं वकील मिलिंद पवार यांनी सांगितलं.

आव्हाड हे जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांनी मजकूर प्रसारित करून हजारेंची बदनामी केली. त्यांच्या नावाचा वापर करून आव्हाड राजकीय प्रसिद्धी मिळवत आहेत. आव्हाड यांच्यावर 10 ते 15 फौजदारी खटले आहेत, असं या नोटीशीत म्हटलं आहे. दरम्यान, यावर जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Tags

follow us