विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 162 जागांची भरती, थेट मुलाखातद्वारे होणार निवड

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये 162 जागांची भरती, थेट मुलाखातद्वारे होणार निवड

VSSC Apprentice Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिप (apprenticeship) पदांच्या भरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 162 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. जे उमेदवार VSSC अप्रेंटिसशिप भर्ती 2023 च्या संधीचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत ते 7 ऑक्टोबर 2023 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. व्हीएसएससी अप्रेंटिस भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट vssc.gov.in वरला भेट देऊ शकतात.

Sanjay Shirsat : ‘मी आता न बोललेलंच बरं’; ‘त्या’ वक्तव्यावर शिरसाटांची सपशेल माघार 

एकूण रिक्त जागा: 162 पदे

पदांचा तपशील –
ऑटोमोबाईल अभियांत्रिकी: 8 पदे
रासायनिक अभियांत्रिकी: 25 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी: 8 पदे
संगणक विज्ञान/अभियांत्रिकी: 15 पदे
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी: 40 पदे
उपकरणे तंत्रज्ञान: 6 पदे
यांत्रिक अभियांत्रिकी: 50 पदे

वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता:
– या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमदेवारांकडे राज्य मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळाची अभियांत्रिकी पदविका प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

– उमेदवारांना ऑटोमोबाईल/केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/विज्ञान/इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंट/मेकॅनिकल इंजिनीअरिंग विषयांमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा पास-आउट असणे आवश्यक आहे.

– 2019 पूर्वी डिप्लोमा पूर्ण केलेले किंवा सध्या डिप्लोमाच्या अंतिम वर्षात असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. त्यामुळे अशा उमेदवारांनी अर्ज करू नये.

मुलाखतीची तारीख: 7 ऑक्टोबर 2023

मुलाखतीची वेळ: सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5

मुलाखतीचा पत्ता: सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज, कलामासेरी, एर्नाकुलम, केरळ.

निवड प्रक्रिया:
संबंधित पात्रता परीक्षेत मिळालेल्या कमाल गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

VSSC भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी:
उमेदवारांना www.nats.education.gov.in किंवा www.sdcentre.org या वेबसाइटद्वारे शिक्षण मंत्रालयाच्या NATS पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

मुलाखतीदरम्यान नोंदणी क्रमांक आणि प्रिंटआउट सोबत ठेवणे बंधनकारक असेल. याशिवाय, महत्वाची कागदपत्रे सोबत असणं आवश्यक आहे
1) पदवी प्रमाणपत्र
2) पदवी कन्सॉलिडेटेड मार्क लिस्ट
3) जन्मतारखेचा पुरावा (10 वे प्रमाणपत्र)
4) जातीचे प्रमाणपत्र

5) नॉन-क्रिमी लेयरचा पुरावा (इमावच्या उमेदवारांसाठी)
6) उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
7) अपंगत्वाचा पुरावा
8) अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
९) पासपोर्ट आकाराचा एक फोटो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube