Pune News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त एआय (AI) तंत्रज्ञानाने विकसित केलेले साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ फोटोंचे छायाचित्र प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. (Annabhau Sathe ai pictorial journey to Pune from tomorrow)
भारतात पहिले असे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुर्मिळ फोटोंचे छायाचित्राची संकल्पना आणि निर्मिती संजय श्रीधर कांबळे यांनी केली आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट उलगडला जाणार आहे. हे छायाचित्र प्रदर्शन पुण्यातील सारसबाग येथील साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ आयोजित करण्यात आले आहे. 31 जुलै सायंकाळपासून हे प्रदर्शन खुले होणार आहे. तर १ ऑगस्टला संपूर्ण दिवस हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून अनेक एआय फोटोज तयार करण्यात आले आहे. संजय कांबळे हे गेल्या सात-आठ वर्षांपासून सोशल मीडिया आणि सोशल कंटेटमध्ये काम करत आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, आमदार रोहित पवार, छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी नगरसेवक वसंत मोरे यांचे फोटोज् तयार केले आहेत.
प्रसिध्द अभिनेता अमेय वाघ यांचाही फोटो तयार केला आहे. संजय कांबळे यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मराठीत वेगवेगळे व्हिडिओ बनवून, त्यांना ट्रम्प तात्या ही ओळख दिली आहे. तसेच जागतिक पातळीवरील नेत्यांचे डम्बिग व्हिडिओ तयार केले आहेत. आता त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरील एआय तंत्रज्ञान वापरून छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.