Pune By-Poll Results 2023 : राष्ट्रवादीला बंडाचा फटका ; चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांचा दणदणीत विजयी

पुणे : चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना एकूण  1 लाख 35 हजार 494 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांना 99 हजार 424 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 02T172609.967

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 02T172609.967

पुणे : चिंचवड मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयी झाले आहेत. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना एकूण  1 लाख 35 हजार 494 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांना 99 हजार 424 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी 36 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना 43हजार 075 मते मिळाली आहेत. अश्विनी जगताप यांना एकूण  1 लाख 35 हजार 494 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या मोठ्या मताधिक्क्यानं विजय झाला. दोन महिन्यांपूर्वी मी आमदार होईल असा विचार ही केलं नव्हता. तेंव्हा साहेब माझ्या लक्ष्मण जगताप साहेब सोबत होते. मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यांची उणिव कायम असेल अशा भावना विजयी झाल्यानंतर अश्विनी जगताप यांनी व्यक्त केल्या. 35 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप 34,999 मतांनी आघाडीवर होते. चिंचवडमध्ये 34 व्या फेरीअखेर अश्विनी जगतापांना 34,326 मतांची आघाडी मिळाली. (Kasba Chinchwad Bypoll Election) 34 व्या फेरीअखेर अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना एकूण 1,31,264 मते मिळाली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे 96,265 मतांची आघाडी मिळाली आहे तर बंडखोर उमेदवार राहुल कलाटे 42,768 यांना मिळाली आहेत.

बाराव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना ८१९० मतांची आघाडी मिळाली. बाराव्या फेरीअखेर अश्विनी जगताप यांना एकूण ८१९० मतांची आघाडी मिळाली. चिंचवडमध्ये बाराव्या फेरीनंतर आश्विनी जगताप आघाडीवरच आहेत, आश्विनी जगताप यांना एकूण ४१,८०१ तर नाना काटे यांना ३३,६११ आणि राहुल कलाटे १२,३५७ मते मिळाली आहेत. चिंचवडमध्ये मतमोजणीच्या दहा फेऱ्या पूर्ण, आश्विनी जगताप आघाडीवरच आश्विनी जगताप- ३५,२२८, नाना काटे- २७,७९४, राहुल कलाटे – १०,६६९ दहाव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना ७४३४ मतांची आघाडी मिळाली होती.

चिंचवडच्या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांकडून करण्यात आलं होतं. महाविकास आघाडीकडून नाना काटेंचा विजय निश्चित असल्याचा दावा करण्यात आला, काटे यांना कलाटेंमुळे निवडणुकीत मताधिक्यांमध्ये मोठा धक्का बसला असल्याने त्यांचा पराभव होण्याची शक्यता आत्तापर्यंत आलेल्या निकालावरुन स्पष्ट होत आहे.

Kasba Bypoll रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं. या दोन्ही जागांसाठी राज्यातून दिग्गज नेत्यांची प्रचार हजेरी होती. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसकडून नाना पटोले तर शिवसेनेच्या नेत्यांनी चिंचवड आणि कसब्याच्या जागेसाठी कंबर कसल्याचं दिसून आलं होतं.

गेल्या महिन्याभरापासून पुण्यात दोन निवडणुका या राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. (Chinchwad Bypoll Election Result 2023) कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने- सामने उभे ठाकले होते. (Chinchwad Bypoll Election) दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने पक्षाने उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं होत.

Exit mobile version