पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात काही तरुणांकडून धुडगूस घालण्याचा प्रकार घडलाय. पुण्यातील खेडमध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तरुणांनी धूडगुस घातल्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम काही वेळासाठी थांबिवण्यात आला होता.
या कार्यक्रमादरम्यान, डिजेच्या तालावर गौतमी पाटीलचं नृत्य सुरु झाल्यानंतर स्टेजच्याखाली उभे असलेल्या तरुणांनी एकच ठेका धरला होता. याच वेळी तरुणांनी गोंधळ घातला आहे.
धुडगूस घालणारे तरुण ज्या ठिकाणी उभे होते, त्यामागेच काही महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला खेड येथील पंचक्रोशीतील अनेक महिलांनी हजेरी लावली होती.
गौतमीचं नृत्य सुरु असतानाच तरुणांनी उभे राहुन ठेका धरला. तरुणांनी ठेका धरल्याने मागे बसलेल्या महिला वर्गाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पाहायला अडचण येत होती. या तरुणांना आयोजकांकडून धुडगूस न घालण्याच्या वारंवार सूचना देण्यात आल्या मात्र, तरुण बेधूंद होऊन नाचत होती.
अखेर यादरम्यान महिलांनाच पुढाकार घ्यावा लागल्याचं पाहायला मिळालंय. कार्यक्रम पाहायला आलेल्या काही महिलांनी यावेळी हातात काठ्या घेत तरुणांचा धुडगूस बंद केला आहे. यावेळी महिलांकडून तरुणांवर काठ्यादेखील उगारण्यात आल्याचं दिसून आलंय.
हा आटा-पिटा सुरु असतानाच तरुणांचा धुडगूस काही थांबतचं नव्हता. अखेर आयोजकांना पोलिसांचा पिंजरा बोलवावा लागला होता. त्यानंतर तरुणांनी धुडगूस घालणं बंद केल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांचा धुडगूस असं एक प्रकारचं समीकरण असल्याचं दिसून येतंय. कारण बीड, सांगली, उस्मानाबाद, शिरुर इथल्या कार्यक्रमांमध्ये तरुणांनी गोंधळ घातल्याचं दिसून आलं होतं.