D. Y. Patil PGDM Institute : डी. वाय. पाटील PGDM इन्स्टिट्यूट, आकुर्डी, पुणे येथे AICTE Training and Learning (ATAL) Academy अंतर्गत “From Blue Ocean to Green Growth: Leveraging AI for Scalable & Sustainable Business Innovation” या विषयावर सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २१ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संस्थेच्या परिसरात ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
या FDP च्या माध्यमातून प्राध्यापक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्यवसायातील नवोपक्रम, शाश्वत विकास, उद्योजकता आणि जबाबदार व्यवसाय पद्धती यांसंदर्भातील आधुनिक संकल्पना व त्यांचे व्यावहारिक उपयोग समजून घेण्याची संधी मिळणार आहे. ‘Blue Ocean’ या संकल्पनेतून नवीन व नाविन्यपूर्ण बाजारपेठ निर्माण करण्यापासून ‘Green Growth’ अर्थात पर्यावरणपूरक, जबाबदार आणि शाश्वत व्यवसायवृद्धीकडे होत असलेल्या संक्रमणावर या FDP मध्ये विशेष भर देण्यात येणार आहे. AI आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व विस्तारक्षम व्यवसाय मॉडेल्स, प्रभावी निर्णयप्रक्रिया, कार्यक्षमता आणि शाश्वत व्यवसाय उपाययोजना यांचा अभ्यास करण्यात येईल.
या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि विषयतज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून सहभागी प्राध्यापकांना ज्ञानविनिमय, संवादात्मक अध्ययन आणि व्यावसायिक विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या FDP चे आयोजन डॉ. शलाका पारकर, संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून डॉ. रश्मी प्रसाद, मुख्य समन्वयक आणि डॉ. संदीप सरकाळे, सह-समन्वयक कार्यक्रमाचे समन्वय व अंमलबजावणी पाहत आहेत.
SS retail IPO खुला: अँकर इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद, 146 कोटींची गुंतवणूक
हा उपक्रम प्राध्यापक विकास, संशोधन, नवोपक्रम, उद्योग–शैक्षणिक सहकार्य आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन शिक्षण अधिक सक्षम करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या FDP संदर्भातील अधिक माहितीसाठी info@dyppgdmi.ac.in वर संपर्क साधावा.
