मुंबई : पुणे विद्यापीठापासून कोथरूड पौड फाट्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्याला अखेर नगर विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दररोज तासंतास वाहतूक कोंडीत सापडणाऱ्या लाखो पुणेकरांची सुटका होणार आहे. नगरविकास विभागाने बालभारती ते पौड फाटा या रस्त्यासह शहरातील अन्य प्रलंबित रस्त्यांच्या विकासालाही परवानगी दिली आहे. याबाबतची अधिसूचनादेखील नगरविकास विभागाकडून काढण्यात आली आहे. (Balbharati To Paud Fata Road Development News)
“राज्य सरकार कसं हातात येत नाही तेच बघतो”; शरद पवारांची विधानसभेसाठी ‘पेरणी’
बालभारती-पौड फाटा रस्त्याला पुणे महानगरपालिकेला (PMC) पर्यावरणवादी आणि नागरिकांनी मोठा विरोध केला होता. यासाठी अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आली होती. अखेर 1987 सालापासून प्रलंबित असणारा पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वरदान ठरणारा HCMTR अर्थात High Capacity Mass Transit Road या रस्त्याला एमआरटीपी अॅक्ट कलम 37 (2) अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
रखडलेला बालभारती ते पौड फाटा रस्ता मार्गी लागणार; नगर विकास विभागाने दिली मंजुरी
.#punenews #letsuppmarathi pic.twitter.com/Pxb4dx3vuG— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 19, 2024
बालभारती ते पौड फाट रस्त्याला नागरिकांचा विरोध
बालभारती ते पौड फाटा रस्ता प्रकल्प लॉ कॉलेज रोडवरची वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. परंतु, या विकासाला पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. 2007 ते 2027 विकासा आराखड्यामध्ये हा रस्ता प्रस्तावित होता. परंतु त्याच्या आखणीबाबत लोकांचे आक्षेप होते. त्यामुळे महानगरपालिकेने पुन्हा एकदा या रस्त्याची आखणी करून लोकांच्या हरकती सूचना घेऊन या रस्त्याची आखणी अंतिम केली. ही आखणी राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने कायद्यानुसार महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम कंपनी कलम 37 (2) अन्वये त्याला मान्यता दिली आहे.
कोण कोणत्या रस्त्यांना मिळाली मंजुरी
नगरविकास विभागाने बालभारती ते पौड फाटा रस्त्याशिवाय शहरातील अन्य रस्ते विकासालाही मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्याने बोपोडी, गणपती मंदिर चतुःश्रृंगी मंदिराजवळ अनगळ मिळकत, पासपोर्ट ऑफिस ते पौड रोड, कर्वे रस्त्यावरील कासट पंप तसेच गांधी लॉन्स ते अलंकार पोलीस चौकी, साकेत ब्रीज ते सिंहगड रस्ता ते स्वारगेट, डिफेन्स कॉलनी, राज्य राखीव पोलीस दल वानवडी, वडगाव शेरी साकोरे नगर विमानतळ 509 चौक रस्त्यासह लक्ष्मीनारायण टॉकीज चौक मार्केट यार्ड उत्सव चौक ते बिबेवाडी कॉर्नर ते गंगाधाम चौक ते लुल्ला नगरपर्यंत विकसित करण्यास मंजुरी दिली आहे.
50:25:25 दिल्ली दरबारी जाण्यापूर्वी फडणवीसांनी फिक्स केला विस्ताराचा फॉर्मुला?
लोकांचा विचार करून राज्य सरकारचा निर्णय
बालभारती ते पौड फाट्यासह शहरातील जवळपास 12 रस्त्यांचा विकास करण्यास नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यानंतर वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार असून, बालभारती ते पौड फाटा हा रस्ता का व्हावा यासाठी अनेक जण अनेक वर्ष प्रयत्नशील होते. अखेर लोकांच्या मनातील आणि भावनांचा विचार करून काम करणाऱ्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुणेकरांना एक चांगला वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला असून, पौड फाटा बालभारती रस्ता हा देखील या रस्त्याचा भाग होणार आहे, याचा आम्हाला आनंद असल्याची प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी दिली. तसेच महापालिका आयुक्तांनी वैज्ञानिक कार्यवाही पूर्ण करून तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आहे.