Baramati Airport: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान बारामती विमानतळावर (Baramati Airport) कोसळून त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय. याबाबत वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी तर हा अपघात नसून, घात असल्याचा संशय व्यक्त केलाय. तर बारामती विमानतळावरील सुविधांवर प्रश्नचिन्ह आहेत. येथील सुविधेबाबात एका वर्षापूर्वी एक अहवाल तयार करण्यात आला होता. तो अहवाल यंत्रणांना देण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (MADC) सूत्रांकडून मिळालीय.
बारामती वैमानिक प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी ही एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे आहे. या कंपनीने गेल्या वर्षी एक अहवाल तयार केला होता. एकप्रकारे विमानतळाचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात विमानतळावर नियमांचे उल्लंघन कसे होती, याची मोठी यादीच होती. हा अहवाल राज्य सरकारच्या गोपनीय यंत्रणांनी वरिष्ठ कार्यालयांकडे दिला होता.
एटीसी यंत्रणा शासनाची नाहीच
ब्युरो ॲाफ सिव्हील एव्हिएशन नावाचं काम करणारी यंत्रणाच बारामती विमानतळावर नाही. एटीसी कंट्रोल टॅावर शासनाचा येथे नाही. खासगी कारवर एव्हिएशन, रेड बर्ड एव्हिएशनचं कंट्रोल टॅावर असल्याचे सांगितले जातंय.
विमानतळांचा कंपाउंड वॉल नाही
बारामती विमानतळाला कंपाउंड वॉल असणं गरेजेचं होते. मात्र येथे कंपाउंड वॉलच नाही. तेथे वॉच टॉवर हवा असतो. पाच सहा वॉच टॉवर असणे गरेजेचे असतं.
बारामती विमानतळ हे विमानतळ नाही
बारामती विमानतळावर धावपट्टी पुरेशी नाही. विमानाची धावपट्टी 1700 मीटरची आहे. ती 2500 मीटर असणे गरजेचे आहे. विमानतळ असणाऱ्या नियमात बारामती विमानतळ बसतच नाही. त्यामुळे बारामती विमानतळ म्हणू शकत नाही ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र म्हणावं लागेल, असे अहवालात म्हटलं होते. बारामती विमानतळ हे विमानतळ नाही, आपत्कालीन धावपट्टी आहे ( इमर्जंन्सी एअरस्ट्रीप ) असं अहवालात म्हटलेलं आहे.
