Baramti Loksabha : बारामती लोकसभा (Baramti Loksabha) निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बारामती मतदारसंघातील चार तालुक्यांमध्ये इन कॅमेरा मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केलीयं. या मतदारसंघात गैरप्रकार घडू शकतो, अशी भीतीही सुप्रिया सुळे यांनी व्यक्ती केली आहे.
साहेब, तुम्ही तब्बेत जपा, आता आम्ही खिंड लढवतो..! शरद पवारांसाठी बीडच्या शिलेदाराचे भावूक उद्गार
बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला आणि दौंड असे सहा मतदारसंघ येतात. बारामती, भोर, पुरंदर आणि दौंड इथले मतदान अत्यंत चुरशीने होण्याची आणि गणित कुठेतरी बरोबरी सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोघांचाही होल्ड आहे. भोरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंची तर सुनेत्रा पवारांना शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, कुलदीप कोंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची मदत होणार आहे.
सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाचा हिशोब न देणं भोवणार
सध्या राज्यात बारामती लोकसभेची मोठी चर्चा सुरू असून नणंद-भावजय असा हा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं पारड जड मानलं जात असताना सुनेत्रा पवारांनी मुंसंडी मारल्याचं चित्र आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील काही घटनांनी ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवार पवार कुटुंबातील असल्याने ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच या निवडणुकीत दडपशाहीचा वापर होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. शेवटच्या दोन-तीन दिवसांत धनशक्ती आणि दडपशाहीचा वापर होईल असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे वेगळीच चर्चा झाली होती. आता सुप्रिया सुळे यांना देखील मनात शंका येत असल्याने त्यांनी इन कॅमेरा मतदान प्रक्रिया पार पडावी, अशी मागणीच निवडणूक आयोगाकडे केलीयं.