Download App

गायक कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, पुनीत बालन यांची माहिती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिध्द गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या हस्ते शनिवारी 12.30 वाजता होणार

  • Written By: Last Updated:

पुणे : भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या (Shrimant Bhausaheb Rangari Trust) बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिध्द गायक पद्मश्री कैलाश खे (Kailash Kher) यांच्या हस्ते शनिवारी (ता. 7) दुपारी 12.30 वाजता होणार आहे. त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात जंगी मिरवणूक देखील निघणार आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बाल (Puneet Balan) यांनी ही माहिती दिली.

रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री, भाजपमध्ये प्रवेश केल्याची पत्नी रिवाबाने दिली माहिती 

याबाबत बोलतांना पुनीत म्हणाले, गणेश चतुर्थीला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात होईल. सुरुवातीला लाठीकाठी मर्दानी खेळ व शंखनाद होईल. त्यानंतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे.

रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री, भाजपमध्ये प्रवेश केल्याची पत्नी रिवाबाने दिली माहिती 

बाप्पाच्या मिरवणुकीत शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु म वि, कलावंत, श्रीराम ही सात ढोल ताशा पथके सहभागी असणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. विशेष म्हणजे 132 वर्षांनंतर पहिल्यांदाच बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या मुहर्तावर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम होणार असल्याचे पुनीत बालन यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती.
– पुनीत बालन,
उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

 

follow us