बैलजोडी विना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक, पुनीत बालन यांची घोषणा

बैलजोडी विना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक, पुनीत बालन यांची घोषणा

Punit Balan : देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बैलजोडीसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आगमन आणि विसर्जन मिरवणुक निघत असते. मात्र आता उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी मोठी घोषणा करत बैलजोडी विना यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आगमन आणि विसर्जन मिरवणुक होणार असल्याची माहिती दिली आहे.

मुक्या प्राण्यांचे हाल होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. ट्रस्टने घेतलेल्या या निर्णयामुळे तब्बल 133 वर्षांपासूनची परंपरा आता खंडित होणार आहे.  आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपाचे वासापुजन सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना पुनीत बालन म्हणाले की, यंदाच्या वर्षी वरद विघ्नेश्वर वाडा ही सजावट गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी 1892 पासून चालत आलेली परंपरा बदलणार आहे. यावेळी आगमन व विसर्जन मिरवणुकीत बैल जोडी न वापरण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. विसर्जन मिरवणूकीला विलंब होतो त्यामुळे रथ ओढणाऱ्या बैलांचे हाल होतात, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावर्षी आगमन मिरवणुकीत बाप्पाचा रथ ट्रस्टचे कार्यकर्ते व भक्त ओढतील आणि विसर्जन मिरवणुकीसाठी एक खास रथ तयार करण्यात येणार असं देखील यावेळी पुनीत बालन म्हणाले.

तर सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले की, आपण कुठल्याही कामाची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेने करतो. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज सात समुद्रापार पोहचला आहे. गणेशोत्सव हा कुठल्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसून या उत्सवात मोठ्या उत्साहाने सर्वजण सहभागी होतात. त्यामुळे येणारा उत्सव हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करू असं रंजन कुमार शर्मा म्हणाले. या उत्सवासाठी पुणे पोलिसांची जी काही मदत लागेल ती आम्ही देणार आहोत असेही रंजन कुमार शर्मा म्हणाले.

झोन वनचे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह तुळशीबाग गणेश मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम यांच्यासह ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

तर मग फिल्म इंडस्ट्री बंद करा

सार्वजनिक गणेशोत्सवात गैर प्रकार चाललात, त्यामुळे हे उत्सव बंद करावेत अशी टिप्पणी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी यांनी केली होती, याबाबत बालन यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शुभांगीताईंनी स्टंट केला.

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

आमच त्यांना निमंत्रण आहे, त्यांनी पुण्यात यावे, येथील सर्वच गणेश मंडळ कसे धार्मिक, सामाजिक, आरोग्याचे उपक्रम राबवितात हे पाहावे. मी स्वतः फिल्म निर्मिता आहे, चित्रपटाच्या माध्यमातून अश्लीलता, व्यासनाधिता अशा गोष्टी दाखविल्या जातात. तर मग फिल्म इंडस्ट्री पण बंद करणार का असा टोलाही बालन यांनी लगाविला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube