Download App

Tushar Kamthe : भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवक तुषार कामठे राष्ट्रवादीत

  • Written By: Last Updated:

पुणे : भाजप सोडलेले चिंचवड मधील माजी नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamthe) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना चिंचवड मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. कामठे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते भाजपमध्ये काम करत होते. त्यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुषार कामठे हे अगोदर राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2017 ला चिंचवड मतदार संघातील पिंपळे निलखमधून निवडून आले होते. तेव्हापासून ते महानगरपालिकेतील विविध भ्रष्टाचार बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला, हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे ते काही दिवसांपूर्वी म्हंटले होते.

Eknath Shinde : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळताच शिंदेंच्या ट्विटरमध्ये मोठा बदल

दरम्यान कामठे यांनी 24 फेब्रुवारी 2022 ला नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये सक्रिय होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अश्विनी जगताप यांच्या प्रचारसाठी मतदार संघात येणार आहेत. त्यामुळे कामठे यांचा राजीनामा भाजप मंजूर करणार का? असा सवाल होता. त्यांच्या कामाची पक्षात दखल घेतली जात नव्हती आणि त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.

Tags

follow us