Download App

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांकडून पुणेकरांना मोठं गिफ्ट

Pune Breaking News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (Pune Metropolitan Region Development Authority)बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्राधिकरणाच्या यंदाच्या एक हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. जुलै 2018 ते एप्रिल 2023 या पाच वर्षांच्या काळातील प्राधिकरणाकडून विकास आणि बांधकाम प्रकरणांमध्ये वसूल करण्यात येणारे 100 टक्के अतिरिक्त विकास शुल्क माफ (Additional development charges waived)करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

The Kerala Story: “खरे नाव बदलावे लागले…” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सह्याद्री अतिथीगृह येथे पीएमआरडीए प्राधिकरणाची दहावी बैठक झाली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रो लाईन 3 हा महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प घोषीत केल्याने 18 जुलै 2018 ते 16 एप्रिल 2023 पर्यंत मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये 100 टक्के वाढीव अतिरीक्त विकास शुल्काच्या थकबाकीचा प्रस्ताव या बैठकीत चर्चेला ठेवला होता. त्यावर या पाच वर्षांच्या काळातील वाढीव अतिरिक्त विकास शुल्क माफ करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

तसेच एप्रिल 2023 पासून जे अतिरिक्त विकास शुल्क लावले जात आहे, ते सरसकट न लावता क्षेत्रनिहाय देता येईल काय हे तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. माफ केलेल्या वाढीव विकास शुल्काची रक्कम सुमारे 332 कोटी एवढी आहे.

यावेळी मोशी पुणे (पीआयईसीसी) येथील 6.50 एकर जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला विनामोबदला हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. पीएमआरडीएचा विकास आराखडा 20 जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आली.

यावेळी पुणे रिंग रोड प्रकल्प, प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातून पुणे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 11 व 23 गावांचा विकासनिधी त्याचबरोबर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाययोजना अधिनियम 2023 ची पीएमआरडीए क्षेत्रात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस पीएमआरडीएच्या क्षेत्रात चालविल्या जातात या महामंडळाला जो तोटा सहन करावा लागतो त्यापोटी 188 कोटी एकवेळ देण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. यावेळी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Tags

follow us