Download App

भाजप उमेदवार हेमंत रासनेंनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : कसबा (Kasba) आणि चिंचवड मतदारसंघाच्या (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी (By Poll Election) आज मतदान सुरु आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या पोटनिवडणुकीसाठी अनेक तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यात उमेदवारांच्या मुलांनीदेखील त्यांचं पहिलंच मतदान केलंय. आपल्या आयुष्यातलं पहिलं मत आपल्या पालकांसाठी केल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय.

आपल्या आयुष्यातील पहिलं मत कायम आठवणीत असतं. चिंचवडमध्ये तिरंगी लढत होतेय तर कसबामध्ये दुहेरी लढत होतेय. कसबा मतदार संघात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या विरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवताहेत. तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होतेय.

Kasba : पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह

चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप तेथून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे निवडणूक लढवत आहेत. तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मुलांनीही पहिल्यांदाच मतदान केलंय. त्यांनी पहिलंच मतदान त्यांची आई अश्विनी जगताप यांच्यासाठी केलंय. माझं पहिलं मतदान हे वडिलांसाठीच असेल असं कायम वाटायचं पण वडिल अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेल्यामुळं त्यांच्या जागेवर आज आईला खंबीर लढावं लागतंय.

त्यामुळं पहिलंच मतदान हे आईलाच केलंय. हे मतदान फक्त विकासासाठी आहे, अशा भावना जगताप यांच्या मुलांनी व्यक्त केल्यात. त्यासोबतच जगताप यांची एकुलती एक मुलगी ऐश्वर्या जगताप हिनेदेखील आईलाच मतदान केलंय.

Tags

follow us