पुणे जिल्ह्याची निवडणूक सूत्रे भाजपने दिली मोहोळ यांच्याकडे, अजितदादा यांच्या विरोधात दुसरा सामना

Muralidhar Mohol यांना पुण्याचे प्रभारी नेमून पुढे येण्यासाठी मोठी संधी दिल्याने त्यांचा अजित पवार यांच्याशी हा थेट दुसरा सामना असणार आहे.

Muralidhar Mohol

Muralidhar Mohol

BJP gives Pune district election cadres to Muralidhar Mohol, second fight against Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. जिल्हा निहाय निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना संपूर्ण पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या मदतीने म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी? घ्या जाणून

यामध्ये पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी भाजपची रणनीती आखण्याचे काम मोहोळ यांना करावे लागणार आहे. या पुणे जिल्ह्यातच त्यांचा सामना हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सोबत होणार आहे. भाजपने पुणे जिल्ह्याचे प्रभारी नेमून मोहोळ यांना नेता म्हणून पुढे येण्यासाठी मोठी संधी दिल्याचे मानले जात आहे. अजित पवार यांच्याशी त्यांचा हा थेट दुसरा सामना असणार आहे.

विराट-रोहितला केलं बाजूला! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी संघ जाहीर, कर्णधार कोण?

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अजितदादा यांच्या विरुद्ध अर्ज भरला होता. या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी यांच्यात तडजोड झाली. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान झाले नाही. पण ऑलिंपिक संघटनेत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्यासोबत त्यांना काम करण्याची जबाबदारी मिळाली आहे. आता महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने अजित पवार यांचा बालेकिल्ला भाजपकडे वळविण्यासाठी मोहोळ काय करतात? हे आता पहावे लागेल.

आशुतोष काळेंनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या 1.80 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच ही लढत अजित दादा विरुद्ध मोहोळ अशीच रंग रंगणार आहे. मोहोळ यांच्या जोडीला पुणे शहरात गणेश बिडकर, भाजपचे संघटनात्मक जिल्हा असलेल्या मावळमध्ये आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड मध्ये आमदार शंकर जगताप आणि बारामतीमध्ये आमदार राहुल कुल हे मोहोळ यांच्या सोबतीला देण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांची निवड, पक्षाची रणनीती, निवडणुकीसाठीचे नियोजन यात निवडणूक प्रमुख म्हणून नेमलेल्या व्यक्तींचा आणि प्रभारी म्हणून असलेल्या मोहोळ यांचा मोठा वाटा असणार आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या नऊ नगरपालिकांमध्ये देखील मोहोळ यांची भूमिका महत्वाची असणार आहे.

चव्हाणांकडून जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारींच्या नियुक्त्या…

Exit mobile version