Download App

मोदीजींना विधानसभा, लोकसभा देणार, शहराध्यक्ष होताच धीरज घाटेंनी केला संकल्प

  • Written By: Last Updated:

पुणे शहर भाजपने खांदेपालट केले असून नवीन शहराध्यक्ष म्हणून माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची नेमणूक केली आहे. धीरज घाटे शहराध्यक्ष झाल्यानंतर आज पुण्यात त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना नवनिर्वाची शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी, मोदीजींना सर्व सहकाऱ्यांच्या साथीनं महापालिका, 8 विधानसभा आणि लोकसभा देणार असल्याचा संकल्प केला. यावेळी मंचावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. (bjp has appointed former house leader dheeraj ghate as the new city president)

धीरज घाटे भाजपचे शहराध्यक्ष झाल्यांनतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 1 ऑगस्टला पुण्यात येत आहेत. यावरूनच पत्रकारांनी घाटे विचार तुम्ही शहराध्यक्ष झाल्यांनतर प्रथमच मोदी पुण्यात येत आहेत. यावर उत्तर देताना धीरज घाटे म्हणतात मी मोदीजींना सर्व सहकाऱ्यांच्या साथीनं पुणे महानगरपालिका तसेच शहरातील 8 विधानसभा आणि लोकसभा देणार आहे.

सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना घाटे म्हणतात माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आज सर्वजण येथे उपस्थित आहेत. स्वतःबद्दल बोलताना घाटे भावुक झाले. माझे – आई वडील मनपाचे सफाई कर्मचारी होते. माझा जन्म हा 10 बाय 10 च्या खोलीत झाला.

प्रकाश आंबडेकर ठाकरेंना धक्का देणार!, वंचितच्या नेत्याने दिले बीआरएस-वंचित युतीचे संकेत

पुढे मी भाजप पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. नंतर नगरसेवक झालो, सरचिटणीस झालो. पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून काम मिळेल असं मला कधीही वाटलं नाही. परंतु पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत मला ही संधी मी या संधीच नक्कीच सोन करून दाखवेल.

माझ्या आधीच्या काळात अनेकांनी चांगलं काम केलंय, मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटलं की येस आता आपण अध्यक्ष झालोय. पुण्यातला कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेऊन काम करेल. आश्वासक पक्ष म्हणून लोकांना वाटलं पाहिजे की हा आपला पक्ष आहे या भावनेतून काम करेल असा विश्वास यावेळी धीरज घाटेंनी व्यक्त केला.

 

Tags

follow us