BJP State Working Committee Meeting : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे बोलले होते की मला काँग्रेस सोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल. आणि आता खऱ्या अर्थाने शिवसेना ही संपलीच आहे, अशा शब्दात नड्डा यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीसाठी यावेळी सी. टी. रवी, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुनील देवघर, विजया रहाटकर अनेक नेते उपस्थित होते. यावेळी स्टेजवर अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जे पी नड्डा यांचे भाषण झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे मंत्री तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी हे बसलेले होते.
यावेळी नड्डा यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा उद्धव ठाकरे गटाकडे वळविला. यावेळी बोलताना नड्डा म्हणाले, शिवसेनेचे दिवंगत नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकदा बोलले होते की मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी शिवसेना बंद करून टाकेल. आणि आज आपण पहिले तर खऱ्या अर्थाने त्यांची शिवसेना ही संपली आहे. अशा शब्दात नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
नड्डांचे भाषण सुरु अन् मंत्र्यांना झोप आवरेना
महाविकास आघाडीवर हल्लाबोल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीवर तसेच त्यांच्या मंत्र्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. दिवस कसे बदलतात हे तुम्ही सगळ्यांनी पहिले असेल. मविआचे काही मंत्री हे जेलमध्ये गेले. तरी यांना काही एक लाज वाटतं नाही आहे. तर काही नेते यांचे आजची जेलमध्येच आहे. असे असताना यांचे नेते राजकारणात आम्हाला प्रश्न करत आहे, अशा शब्दात नड्डा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.