पुणे मनपासाठी भाजपचे प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार निश्चित; 100 जणांची संभाव्य यादी समोर…

BJP ने पुणे मनपा प्रभाग क्रमांक 25 मध्ये त्यात स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, स्वरदा गौरव बापट आणि कुणाल टिळक यांना संधी दिली आहे

BJP

BJP

BJP’s candidate for ward number 25 for Pune Municipal Corporation confirmed : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्र लढत असले तरी अनेक ठिकाणी वेगळी समीकरणा देखील पाहायला मिळत आहेत. त्यातच आता भाजपने पुणे महानगरपालिकेसाठी 100 जणांच्या नावाची संभाव्य यादी निश्चित केली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 25 साठी स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, स्वरदा गौरव बापट आणि कुणाल टिळक यांना संधी दिली असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रभाग क्रमांक 25 चे उमेदवार निश्चित…

या भाजपच्या संभाव्य यादीमध्ये असलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 25 साठी स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, स्वरदा गौरव बापट आणि कुणाल टिळक यांना संधी दिली असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच गणेश बिडकर यांनी प्रभाग क्रमांक 24 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी युती की महायुती? महाविकास आघाडीचे वेट अँड वॉच 

दरम्यान पुण्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती कधी होणार? जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार? त्याचबरोबर उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची प्रतिक्षा असताना भाजपने थेट 70 ते 80 उमेदवारांना एबी फॉर्म देत उमेदवारांना प्रचार करायला सांगितल्याची माहिती समोर आली आहे. 

Exit mobile version