पुण्यातील ‘बर्गर किंग’ च्या अडचणी वाढल्या; पुणे ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला मुंबई HC ची स्थगिती

पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटळत पुण्यातील बर्गर किंगला आहे त्याच नावाने हॉटेले चालवण्याची परवानगी दिली होती.

Letsupp Image   2024 08 26T153125.050

Letsupp Image 2024 08 26T153125.050

मुंबई : पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटळत पुण्यातील बर्गर किंगला (Burger King) आहे त्याच नावाने हॉटेले चालवण्याची परवानगी दिली होती. मात्र, पुणे ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात अमेरिकन बर्गर किंग कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पर पडली यात मुंबई उच्च न्यायालयाने पुणे ट्रायल कोर्टाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुण्यातील बर्गर किंगला नाव वापरण्यासाठी प्रकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Bombay High Court Interim Stay Oo Pune Trial Court’s Burger King Trade Mark Row )

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग नावाने एक आऊटलेट आहे. जे शापूर आणि अनाहिता इराणी हे जोडपे चालवते. मात्र, या जोडप्यावर अमेरिकन कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने साधारण 13 वर्षांपूर्वी कायदेशीर खटला दाखल केला. यात संबंधित कंपनीने पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरू नये अशी मागणी करण्यात आली होती. याचिकेत अमेरिकन कंपनीने ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा हवाला देत खटला दाखल केला होता.

पुणे न्यायालयात काय झालं होतं?

सुमारे 13 वर्ष चाललेल्या कायदेशील लढाईत 16 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटाळून लावला. तसेच पुण्यातील बर्गर किंगला आहे त्याच नावाने व्यवसाय सुरू ठेवण्याचे आदेश होते. पुण्याचा बर्गर किंग 1992 पासून नाव आणि ट्रेडमार्क वापरत आहे, जेव्हा अमेरिकन कॉर्पोरेशनने भारतात आपला ट्रेडमार्क नोंदणी केला नव्हती असे महत्त्वपूर्ण निरीक्षण या सर्व प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायमूर्ती वेदपाठक यांनी नोंदवले होते.

गोड बातमी ! सचिन तेंडूलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’

याशिवाय न्यायालयाने सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतात जवळपास 30 वर्षांपासून या नावाने काम केले नाही, तर पुण्यातील रेस्टॉरंटने ‘बर्गर किंग’ या नावाने सातत्याने सेवा दिली आहे. अमेरिकन बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली आणि 2014 मध्ये भारतात प्रवेश केला. त्यावेळी संबंधित कंपनीच्या लक्षात आले की, आपल्या नावासारखेच एक आऊटलेट पुण्यात सुरू आहे.

Video : हे मला काढायला ठेवलं का?, नव्या इमारतीच्या पायरीवर पाय ठेवताच अजितदादा भडकले

स्थानिक नावामुळे ब्रँडची  प्रतिष्ठा खराब होत आहे

या प्रकरणात अमेरिकन कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने दावा केला होता की, पुण्यातील बर्गर किंग या नावाच्या स्थानिक रेस्टॉरंटमुळे ब्रँडची प्रतिष्ठा खराब होत आहे. मात्र, पुण्याच्या बर्गर किंगने ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचे सिद्ध करण्यात अमेरिकन कंपनी अपयशी ठरली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अमेरिकन कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने दाखल केलेला 2011 चा खटलादेखील फेटाळून लावली. फिर्यादी कंपनीच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि वास्तविक नुकसान यासंबंधी कोणताही पुरावा नसल्यामुळे, यूएस कंपनी कोणत्याही नुकसानीस पात्र नसल्याचेही पुणे न्यायालयाने म्हटले होते.

Exit mobile version