LetsUpp Diwali Ank: दिवाळी अंकांतील परंपरेत आपलं नाव अल्पावधित कोरणाऱ्या ‘लेट्सअप दिवाळी अंक 2025’चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आहे. सोशल माध्यम जगतामध्ये बुलंद आवाज असलेल्या ‘लेट्सअप’चा हा तिसरा दिवाळी अंक आहे. यंदाच्या अंकांचे वैशिष्ट्येही खास आहे. हा अंक ‘महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा वारसा’ या विषयाला वाहण्यात आलेला असून, ‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’मुळे अंक वेगळ्या उंचीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरामध्ये वादळी कारकीर्द करणाऱ्या क्रीडा, राजकारण, समाजकारण, उद्योगव्यवसाय इतर क्षेत्रातील 25 दिग्गज महाराष्ट्रीय व्यक्तींची करून दिलेली ओळख हे या अंकाचे बलस्थान आहे.
‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’ या भागाचे मुख्य प्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आहे. तर सहप्रायोजक ‘ग्रॅव्हिट्स फाउंडेशन’ व मालपाणी उद्योग समूह आहे. हा दिवाळी अंक बुकगंगावर उपलब्ध झाला आहे.
लिंकवर क्लिक करा
https://www.bookganga.com/eBooks/B/97APK
अंकात काय वाचाल ?
▶️ महाराष्ट्रातील आवर्जून पहावी अशी मंदिर आणि त्यांचा इतिहास काय?
▶️ जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झालेल्या शिवस्वराज्यातील १२ गडकोटांची अनोखी वैशिष्ट्ये.
▶️ देशाला ६ वेळा पंतप्रधान, ३ वेळा राष्ट्रपती देणारा रा. स्व . संघ शताब्दीपर्यंत टिकला कसा?
▶️ महाराष्ट्र मराठ्यांचा की मराठींचा?
▶️ गाव खेड्यातला महाराष्ट्र हरवला कुठं?
▶️ सिनेमातलं कॅरेक्टर शोभावं असं इरसाल पण वास्तवातलं व्यक्तिचित्रण
▶️ २०२४ मध्ये निवडून आलेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विधानसभेतला हा तपशील तुम्ही जाणता?
▶️ जग चाललंय ‘जीन एडिटिंग’कडे भारत कुणीकडे?
▶️ ‘शोले’ची पन्नाशी किती ओरिजनल?
इतिहास, राजकारण, मातृभाषा, चित्रपट, कृषी अशा विविध विषयांवरचा भरगच्च मजकूर. या दिवाळी अंकाचे लेखक आहेत ज्येष्ठ मूर्तितज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, ज्येष्ठ संपादक-लेखक प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत जयदेव डोळे, आयकर आयुक्त भरत आंधळे, ज्येष्ठ पत्रकार निखिल गजेंद्रगडकर, कृषी पत्रकार मंदार मुंडले इत्यादी.