ब्रेकिंग! पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे; सिंहगड रोडला प्रथमच मिळाला महापौर पदाचा मान

Pune Mayor साठी सर्वसाधारण महिलेचे आरक्षण पडल्यानंतर अनेक नावांची चर्चा झाली अखेर मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले आहे.

Pune Mayor

Pune Mayor

Breaking! Manjusha Nagpure appointed as Pune Mayor Sinhagad Road gets honor of being first Mayor : पुणे महानगपपालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अखेर हे नाव समोर आले आहे. पुण्यामध्ये महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामध्ये अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर अखेर आता पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले आहे.

सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

दुसरीकडे ही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसा अजित पवारांनी शब्द दिलेला होता. तो पाळला जाणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाही निवडणूक त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार…

पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली होती. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही. अशी माहिती राष्ट्रवादी कॉ्ंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान महापालिकांच्या निवडणुकांनंतर राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये अनेक महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेल्या महापालिकांपैकी एक असलेल्या पुणे महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झालं होतं.

त्यामुळे आता पुण्यामध्ये स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपच्या सर्वसाधारण महिला प्रवर्गातील महापौर पदासाठी इच्छुक आणि संभाव्य महापौर पदाच्या उमेदवारांची नावं समोर आली होती. त्यामध्ये रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते, मंजुश्री खर्डेकर यांच्या नावाचा उल्लेख केला जात होता. मात्र अखेर महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले आहे.

Exit mobile version