पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा ( Kasba ) पेठ पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली तर हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांना 61 हजार 771 मते मिळाली. भाजपचे उमेदवार कसब्यात पराभूत झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक ( Kunal Tilak ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं या पराभवाच्या कारणांचा अभ्यास करण गरजेचं आहे. असं टिळक यांनी म्हटलं आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघात भाजपचा पराभव झाला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले असून त्यांनी हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला आहे. विशेष बाब म्हणजे 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना कुणाल टिळक म्हणाले, कसब्यात भाजपचा पराभव झाल्याने कसबा आता भाजपाकडे नसणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला मते देखील जास्त मिळाली आहे. यामुळे भाजपने याचा सखोल विचार करणे गरजेचं आहे. का हा पराभव झाला? आपण कोठे कमी पडलो? अगदी मायक्रो प्लॅनिंगनं प्रचार करण्यात आला आता तेवढ्याच मायक्रो प्लॅनिंगनं पराभवाचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला कुणाल टिळक यांनी भाजपाला दिला आहे.
Ravindra Dhangekar : ठाकरेंचे विश्वासू सहकारी ते काँग्रेसचे आमदार, धंगेकर यांचा प्रवास
भाजपा व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीसाठी भाजपच्या बड्या नेतेमंडळींनी पुण्यातच तळ ठोकला होता. तसेच भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील निवडुकीच्या मैदानात उतरले होते. तरीही मात्र कसब्यात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. यावर कुणाल टिळक यांना विचारण्यात आले असता टिळक म्हणाले, रवींद्र धंगेकर यांनी पहिल्यापासूनच माऊथ पब्लिसिटी जास्त केली. मात्र आम्ही यामध्ये आम्ही कोठेतरी कमी पडलो असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ठ केले.
VT 13 : ‘या’ चित्रपटातून वरुण तेज करणार बॉलिबूडमध्ये पदार्पण
टिळक कुटुंबात उमेदवारी दिली असती तर…
कसब्यात मुक्ता टिळक यांच्याच घरातील एखाद्याला उमदेवारी दिली असती तर निवडणुकीतील चित्र पलटले असते का? यावर कुणाल टिळक म्हणाले, आता या प्रश्नामध्ये काही तथ्य नाही. आता आज हा जो निकाल लागलेला आहे याचे आत्मपरीक्षण पक्षाने करणे गरजेचे आहे. तसेच आगामी काळात 2024 मध्ये जर भाजपाला कसबा जिंकायचा असेल तर आतापासूनच तयारी करावे लागले. तसेच कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी लोकांपर्यंत पोहचण्याचे काम करावे. आपण निवडणुकीत कोठे कमी पडलो आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे असे टिळक यावेळी म्हणाले आहे.