Download App

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीवर काळाचा घाला; टायर फुटून गाडी खडकवासला धरणात बुडाली

  • Written By: Last Updated:

पुणे : संपूर्ण राज्यात काल (दि. 30) रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. मात्र, याच दिवशी राखी बांधण्यासाठी जात असताना टायर फुटून चार चाकी गाडी खडकवासला धरणात (Khadakwasala Dam) बुडाली. यात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कृती सोमनाथ पवार (वय 12 वर्षे रा. नांदेड सिटी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.

Toordal Price Hike : ऐन सणासुदीत डाळी महागल्या 100 रुपयांची तूरडाळ 170 रुपयांवर

याबाबत अधिक माहिती अशी की, संस्कृती पवार ही तिच्या कुटुबियांसोबत राखी पोर्णिमेसाठी मूळ गाव असलेल्या पानशेत या ठिकाणी जात होते. त्यावेळी अचानक कुरण बुद्रुक गावाजवळ गाडीचे उजव्या बाजूचे टायर फुटले. त्यामुळे सोमनाथ पवार यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार खडकवासला धरणात कोसळली.

शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पूनावाला याचं मोठं विधान…

ज्यावेळी कार धरणाच्या पाण्यात कोसळली त्यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारमधील सोमनाथ पवार, त्यांच्या पत्नी अर्चना आणि मुलगा प्रद्युम्न यांना वाचविले. मात्र, संस्कृती कारमध्येच अडकली. कार पाण्यात बुडाल्याने तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र, तिला वाचवता आले नाही. रात्री उशिरा बुडालेली कार बाहरे काढण्यात आली त्यावेळी संस्कृतीचा मृत्यू झाला होता.

रक्षाबंधनाच्या दिवशी अशाप्रकारे अपघात होऊन 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून, पुणे-पानशेत रस्त्यावरील दुरावस्थेमुळे अपघात होऊन मृत्यू होण्याचेप्रमाण वाढल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

Tags

follow us