शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पूनावाला याचं मोठं विधान…

  • Written By: Published:
शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पूनावाला याचं मोठं विधान…

Cyrus Punawalaon on Sharad Pawar : काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेशी फारकत घेत सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयावरून थेट भाष्य केलं होतं. पवारांचं वय झाल्यानं कुठंतरी थांबायला हवं असं म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्त होण्यास सांगितलं होतं. दरम्यान, आता शरद पवारांचे जीवलग मित्र आणि सिरम इन्सिट्युटचे संस्थापक सायरस पूनावाला (Cyrus Punawala) यांनीही पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला.

सायरस पुनावाला आज पुण्यात एक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवारांविषयी विचारले होते. तेव्हा पूनावाला यांनी शरद पवारांचे कौतुक करत एक खंतही बोलून दाखवली. ते  म्हणाले की, शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी होती, मात्र त्यांनी ती घालवली. ते फार हुशार व्यक्ती असून ते जनतेची चांगली सेवा करू शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी आत निवृत्ती घ्यावी, असा सल्ला पूनावाला यांनी दिला.

मे महिन्यातही शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. यानंतर पवारांनी आपला निर्णय बदलला होता. त्यानंतर अजित पवारांनी बंड करून शरद पवारांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. निवृत्तीचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. भारतीय जनता पक्षात निवृत्तीचे वय ७५ वर्षे आहे. अशा परिस्थितीत वयाची ८२, ८३ वर्षे वय झालं तरी आमचे वरिष्ठ थांबत का नाहीत, असा सवाल अजित पवारांनी केला होता.

वडेट्टीवारांच्या आरोपांवर विखेंचा टोमणा! विजुभाऊ… जरा संयमाने भूमिका मांडा 

त्यावर शरद पवारांनी मी आणखी जोमाने काम करेल, मी थांबण्याचा प्रश्नच येत नाहीत. उगाच वया-बियाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला होता.

दरम्यान, आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक सायरस पूनावाला यांनी देखील शरद पवारांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिलाा आहे. त्यामुळं शरद पवार हे  पूनावाला यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube