वडेट्टीवारांच्या आरोपांवर विखेंचा टोमणा! विजुभाऊ… जरा संयमाने भूमिका मांडा

वडेट्टीवारांच्या आरोपांवर विखेंचा टोमणा! विजुभाऊ… जरा संयमाने भूमिका मांडा

विजुभाऊ जरा संयमाने भूमिका मांडा, असा टोमणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांना मारला आहे. विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमध्ये मतभेद असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी वडेट्टीवारांना टोमणा मारला आहे.

शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे ; सायरस पुनावाला याचं मोठं विधान…

पुढे बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याने ते आपली भूमिका मांडू शकतात, भूमिका मांडण हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे, पण विजूभाऊला एकच विनंती आहे की, त्यांनी आपली भूमिका थोडं सयंमाने मांडावी, असा सल्ला असल्याचं राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केलं आहे.

Wadhawan बंधूंवर मेहेरबान झालेल्या पोलिसांना दणका : एका अधिकाऱ्यासह 7 जणांवर मोठी कारवाई

तसेच महायुती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतात. महायुतीत समन्वय राहण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा समितीमध्ये आहेत त्यामुळे मी समितीमध्ये असलो काय आणि नसलो काय, त्याचं काही नाही. शेवटी नेते निर्णय घेत असतात, आमचं काम अंमलबजावणी करायंच असतं, अशी प्रतिक्रियाही राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या निवडीवर दिली आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐवजी अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. मंत्रीमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सांमत, अतुल सावे, दादा भुसे यांचा सदस्यांमध्ये समावेश आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube