Pune Municipal Corporation : पुण्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, पर्वती पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांसह दहा ते अकरा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक सुरज लोखंडे आणि नगरसेवक प्रिया गदादे पाटील यांच्यासह दहा ते अकरा जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नगरसेवक सुरज लोखंडे (Suraj Lokhande) आणि प्रिया गदादे पाटील (Priya Gadade-Patil) यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) अभ्यासिका व ग्रंथालयात (Library) अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अभ्यासिका व ग्रंथालयाचे नुकसान करून चोरी केल्याचाही आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jio Offers : महागाईत दिलासा ; Jio देणार एका रिचार्जवर दुसरा फ्री फ्री …
फिर्यादीच्या संमतीशिवाय अभ्यासिका व ग्रंथालयात प्रवेश का केला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीला सर्वांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप देखील फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात पर्वती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पर्वती पोलिस करत आहेत.
संगमनेर बस स्थानक ते प्रवरा नदी पूल रस्त्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर-
