Download App

Narendra Dabholkar: हत्या प्रकरणाचा सीबीआयचा तपास पूर्ण

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या हत्येचा तपास पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयच्यावतीने (CBI) हायकोर्टात (High Court) देण्यात आली.

या प्रकरणाचा अहवाल दिल्लीतील मुख्यालयात पाठवला आहे. यावर येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल असं एएसजी अनिल सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

याची नोंद घेत याप्रकरणी आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांकरता तहकूब केली. याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. ज्यात 32 पैकी 15 साक्षीदारांची साक्षही नोंदवून पूर्ण झालीय, अशी माहिती अनिल सिंह यांनी कोर्टाला दिली.

दाभोलकर कुटुंबियांचे वकील अभय नेवगी म्हणाले, याप्रकरणी अद्याप काही आरोपी फरार आहेत, हत्येकरता वापरलेलं हत्यार, बाईक या गोष्टी अजूनही सापडलेल्या नाहीत. याशिवाय या हत्येमागचं नेमकं कारण आणि त्याचे सूत्रधार कोण याचाही शोध लागायचाय. त्यामुळे याप्रकरणी हायकोर्टाची देखरेख आवश्यकच असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

Tags

follow us