पुणे : कसबा पोटनिवडणूक (Kasba Bypoll) ही रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध हेमंत रासने (hemant Rasne) अशी नाही तर भाजप (BJP) विरुद्ध थेट काँग्रेस (Congress) अशी आहे. महाविकास विरुद्ध भाजप अशी ही लढत नाही. कारण त्यांचा काय अस्तित्वच नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला वाऱ्यावर सोडून दिलेले दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांच्या सरकार मध्येही काँग्रेसचे स्थान कुठेही नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्षच सत्ता चालवात असल्याचे पाहायला मिळत होते. काँग्रेस देशात टिकली नाही, राज्यात टिकली नाही, तर मग गल्लीत काय टिकणार आहे. देशात विरोधीपक्ष नेतेपद नाही मिळाले, असा टोला भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला लगावला.
कसबा मतदार संघ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारप्रसंगी माध्यमांशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलताना काँग्रेसवर टीका केली. कसबा पोटनिवडणूक ही काँग्रेस आणि भाजप अशीच आपल्याला पाहायला मिळेल. कारण काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वाऱ्यावर सोडून दिलेले आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर कोणतीही टीपन्नी करणार नाही. घटनेच्या बाहेर कुणाला जाता येणार नाही, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. तर आत्मविश्वासाने सांगणं म्हणजे त्याचा अभ्यास केला असेल, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय मँनेज केलं असे होत नाही.