Download App

शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा पाणउतारा; म्हणाले, ‘शहाण्या माणसाबद्दल विचारा…’

  • Written By: Last Updated:

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर ११ हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजपा उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर नवनिर्वाचीत आमदार धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना शरद पवारांनी भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे.

जरा शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे पत्रकारांना सांगून पत्रकारांचा प्रश्न धुडकावून लावला आणि चंद्रकांत पाटलांबद्दल बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. खरंतर राज्याच्या राजकारणात कधीही कोणावर वैयक्तीक आणि द्वेषपूर्ण टीका-टिप्पणी न करताही एखाद्याचा कसा समाचार घ्यायचा आणि त्याचा पाणउतारा करायचा, कसब साधलेल्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे, शरद पवार. शरद पवार हे अतिशय सूचक आणि मोजक्या शब्दांत विरोधकांवर जोरदार टीका करत असतात. त्यांच्या प्रत्येक टीकेची राज्याच्या राजकीय वर्तुळात कायम चर्चाही रंगत असते. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला राज्याच्या राजकारणात इतकं महत्त्व का आहे, याचा प्रत्यय आज झालेल्या पुण्यातील पत्रकार परिषदेत आला. यावेळी शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा त्यांच्या खास स्टाईलमध्ये खरपूस समाचार घेतला.

Mohan Bhagwat : ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतात बेरोजगारी नव्हती, मोहन भागवत यांचा दावा

कसबा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कसबा पोटनिवडणुकीसह अन्य राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पवार यांना चद्रकांत पाटील यांच्याविषयीचा पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चंद्रकांत पाटील यांचं नाव पत्रकारांनी घेताच शहाण्या माणसाबद्दल विचारा, असं म्हणत पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावला आणि पाटलांचा एका वाक्यात पाणउतारा केला.

जरा शहाण्या माणसांबद्दल बोललेलं तर होईल, अशा शब्दांत पवार यांनी पाटील यांची खिल्ली उडविली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितींमध्ये एकच हशा पिकला. शरद पवार यांनी आपल्या या एका वाक्यानं चंद्रकांत पाटील यांचे नावही न घेता त्यांची खिल्ली उडवूण पाणउतारा केला. या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Tags

follow us