Download App

Kasaba By Election बिनविरोध घोषित करावं ; पटोलेंना चंद्रकांतदादांचे आवाहन

पुणे : कसबा मतदारसंघात भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. यादरम्यान नाना पटोलेंच्या (Nana Patole) या विधानाचा भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आम्ही जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न का करत आहे, मुळात काँग्रेसला पुण्यात दोन्ही जागांची पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही. यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे, की निवडणुकीला अजूनही ४८ तास बाकी आहेत, आम्ही जर टिळकांच्या घरात उमेदवारी दिली, तर काँग्रेसने ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असे घोषित करावं, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

तसेच “नाना पटोले जे म्हणत आहेत, ते न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. आम्ही या निवडणुकीसाठी तयारी केली आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोलेंना लगावला. कसबापेठ पोटनिवडणुकीबाबत बोलताना, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी, अशी विनंती केली. मात्र कसबा मतदारसंघात भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही कसब्याची जागा लढवणार असल्याचे मी त्यांना सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती. तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत मी स्वत: लक्ष देत असून ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असंही ते म्हणाले होते.

Tags

follow us