Download App

Chandrakant Patil : घर फोडण्याची परंपरा काँग्रेस अन् राष्ट्रवादीची!

पुणे : सत्यजित तांबे यांनी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे यांना भाजपची फूस होती. त्यांनीच काँग्रेसचे घर फोडले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर बोलताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत यांनी घरं फोडण्याबाबत जे बोलतात, त्यांना मी एकच सांगू इच्छितो की, घरं कोणी कोणाची फोडली हे जरा आपण स्वत: तपासून पाहावे. घर फोडण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आमदार मुक्ता टिळक, तर चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्यानिधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदारतयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपची आज महत्वाची एक बैठक पार पडली. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग आणि विश्वास घात कोणी केला. २०१९ मध्ये तुम्ही गद्दारीच केली ना. पाठीत कोणी खंजीर खुपसली याच्यावर एक वेगळी परिषद घ्यायला हवी. सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. पुढे काय करायचे ते त्यांनी ठरवायला हवे.

Tags

follow us