पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे संत माणूस आहेत. त्यांनी काल पत्रकार परिषदेत मी रवींद्र धंगेकर यांच्या घरी जेवायला जाईल, असे म्हटले. आपली संस्कृती अतिथी देवो भवची आहे. त्यामुळे त्यांना मी घरी जेवायला नक्की बोलवेन. पण त्यांनी यायला पाहिजे. कारण ते मला ओळखतच नाही. लोकमान्य टिळक कुटुंबाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. त्यामुळे त्या कुटुंबाचा चंद्रकांत पाटील यांनी अपमान करायला नको होता, असा टोला कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लगावला.
कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने काल पुण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. मी बराच वेळ बसलो. पण त्यांनी काही माझ्याकडे बघितलेच नाही. आमदारांच्या बैठकीत ते भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर यांच्याशी चर्चा करत होते. मला वाटले ही त्यांच्या पक्षाची बैठक आहे. त्यामुळे मी तेथून निघून आलो, असा पलटवार कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांनी नंतर मी धंगेकर यांच्या घरी जेवायला जाईल, असे वक्तव्य केल्याचे ऐकल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. तसेच माझं घर सर्वांसाठी उघडे असते. ते माझ्या जेवायला येणार असतील तर मी नक्की त्यांना बोलावेन. आपली संस्कृती अतिथी देवो भव अशी आहे. आणि चंद्रकांत पाटील हे संत माणूस आहे. त्यामुळे साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा, असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली.
रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी वैयक्तिकरित्या लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबाला खूप मानतो. त्यांचे योगदान खूप मोठे आहे. मुक्ता टिळक या त्यात कुटुंबातील आहे. त्यामुळे त्या कुटुंबाचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी करायला नको होता.
(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube