पुणे : भाजप (BJP) एकमेव राजकीय पक्ष ज्यात दर तीन वर्षांनी बूथ स्तरप्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होतात. नवीन कार्यकर्त्यांनी नेतृत्व करण्याची संधी दिली जाते. बाकी कुठल्याही पक्षात निवडणुका होत नाही, त्यामुळं खऱ्या अर्थाने भाजप हा लोकशाही असणारा पक्ष आहे, असं विधान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. (Chandrakant Patil on loksabha and narendtra modi became PM)
पुणे शहराचे नव नियुक्त शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा आज भव्य सत्कार सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, भाजप एकमेव राजकीय पक्ष ज्यात दर तीन वर्षांनी बूथ स्तरप्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होतात. अन्य पक्षात निवडणुकाच होत नाहीत. आणि झाल्यातर बरीच पदाधिकारी हे रिपीट होतात. आतापर्यंत पुणे शहराचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी खूप चांगले काम केलं. मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढविला, पक्षाची प्रतिमा वाढवली. आता सर्वाचं मत आजमावून नवीन अध्यक्ष निवडला. तीच प्रक्रिया भाजपच्या मंडल अध्यक्ष निवडीसाठी राबविणार आहे, असं पाटील म्हणाले.
‘राहुल गांधींसाठी योग्य मुलगी शोधा’, सोनिया गांधींनी दिली जबाबदारी
ते म्हणाले, धीरज घाटे यांच्या नेतृत्वात काम दहा पावले पुढे न्यायचे आहे. तुम लढो, हम कपडे सांभाळते असं नाही, तर हम साथ है…. अशी आपली भूमिका आहे. संघटन हा धीरजचा पींड आहे. स्थायीभाव आहे. आता त्यांच्या नेतृत्वात आपल्याला काम करायचं आहे. सरकार नसतांना आपल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचं सत्तेतील लोकांनी केलं. वावड्या उठवल्या. मात्र, जगदीश मुळीक यांनी पक्ष वाढवला. आता घाटेंच्या नेतृत्वात काम करायचं आहे. ते अगदी सामान्य परिस्थितीतून पुढं आल्यानं ते पक्ष संघटनेचं काम जोरात करतील. आणि सर्वांना बरोबर घेऊन जातील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पाटील म्हणाले, काही दिवसांपासून लोकसभेत कोणाला कौल मिळेल, याचे रिपोर्ट येत आहेत. सगळ्याचं रिपोर्टमध्ये मोदी पुन्हा सत्तेत येतील असं सांगितल्या जातं. आगामी निवडणुकीत मोदीच येतील. कुणालाही विचारलं तर कुणीही मोदीचच नाव सांगलोय. मोदींशिवाय समोर आहेच तरी कोण? अशी शब्दात त्यांनी विरोधकांची खिल्लीही उडवली.
आपल्या नेतृत्वाने खूप मोठी सोय निर्माण केली आहे. आपल्याला लोक स्विकारतातच. पण, आता आपल्याला मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत न्यायचे आहे. मला एकदा एक आजी म्हणाल्या, तुम्ही पक्षाचं चिन्हच का मोदी करत नाहीत, इतकी मोदींची जनतेमध्ये क्रेझ आहे. त्यामुळं आपल्याला मोदी आणि भाजप ही चांगली पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी पुढे न्यायची आहे. कोणाबरोबर युती करायची हे देवेंद्र फडणवीस ठरवतील. ते खूप हुशार राजकारणी, आपल्या विधानसभेत १५२ पेक्षा जास्त जागा येतील, असं पाटील यांनी सांगितलं.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, अमर साबळे, संजय काकडे, माजी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, प्रदीप रावत, रवींद्र अनासपुरे, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, हेमंत रासने, गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, संदीप खर्डेकर, अर्चना पाटील, राघवेंद्र मानकर आदी उपस्थित होते.