Download App

Video : सामान्य तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास चंद्रकांतदादांचा नकार; दिले चौकशीचे आदेश

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) पत्रकार परिषदेत एका तरूणाने प्रश्न विचारण्याच्या प्रयत्न केल्याने गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. चंद्रकांतदादांना प्रश्न विचारणारा हा तरूण वनविभागात नोकरीसाठी अनेकवर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, अचानक दादांना या तरूणाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्याने स्वतः चंद्रकांत पाटील काहीसे गोंधळून गेले. तसेच त्यांनी तुम्ही पत्रकार नसाल तर बाजूला होण्याच्या सूचना करत उपस्थित पोलिसांना तरूणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

आमच्याकडे कुणीही CM होऊ शकतो; फडणवीसांनी स्वतःचं केला ‘सेल्फ’ गोल

नेमकं काय घडलं?

पुण्यातील एफसी महाविद्यालयात सध्या बुक फेस्टिवल (Pune Book Festival) सुरू आहे. याच ठिकाणी आज (दि.21) चंद्रकांत पाटील भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत असताना कुणाल नावाच्या तरूणाने दादांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित तरूणाला पत्रकार आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तरूणाने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर चंद्रकांतदादांनी पत्रकार नसाल तर बाजूला व्हा बाजूला व्हा असे सांगितले.

दादांना प्रश्न विचारणारा तरूण कोण?

चंद्रकातदादांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव कुणाल असे असल्याचे सांगितले जात असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागात नोकरीसाठी परीक्षा देत आहे. मात्र, अनेकादा प्रयत्न करूनही देखील वनविभागातील एका विभागात त्याला नोकरी लागली नव्हती. याच संबंधिचा प्रश्न विचारण्यासाठी कुणाल तेथे आला होता. मात्र, प्रश्न विचारणारी व्यक्ती पत्रकार नससल्याचे लक्षात येताच चंद्रकांत पाटील काहीसे गोंधळून गेले. त्यांनी तुम्ही कोण असा प्रश्न केला. त्यावर मी सामान्य व्यक्ती असून, आपल्याला प्रश्न विचारायचा आहे असे कुणालने उत्तर दिले.

BHR पतसंस्था गैरव्यवहार! अनेक पोलीस अधिकारी अडकणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मात्र, जर तुम्ही पत्रकार नसाल तर, बाजूला व्हा असे म्हणत तो तरूण कोण आहे त्याची चौकशी करा असे आदेश उपस्थित पोलिसांनी चंद्रकांतदादांनी दिले. त्यांनतर या तरूणाची चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे चंद्राकांत पाटील काहीसे गोंधळून गेले होते.

Tags

follow us