Download App

Chandrashekhar Bavankule : गिरीश बापट आजारी… तरी त्यांना प्रचाराला उतरू का?

  • Written By: Last Updated:

पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे नाराज नाही. ते आमचे नेते आहेत. आता ते आजारी आहेत अशा अवस्थेत त्यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) प्रचाराला यावं अशी तुमची इच्छा आहे का? त्यांची कोणतीही नाराजी नाही. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. बापट यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मीडियाला विनंती आहे की तुम्ही अशा बातम्या चालवू नका आणि व्यक्तिगत कुणावर बोलू नका, असे आवाहन भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी काल दिवसभर बैठका घेण्यात आल्या. त्याबाबत माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल झालेल्या बैठकीत कुणीही उद्योजक आले नव्हते. मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोअर ग्रुपचे मेंबर या बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीत निवडणुकीच विश्लेषण करण्यात आले. औपचारिक बैठक होती यात देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. भाजप प्रत्येक निवडणुकीत ताकद लावते हे तुम्हाला कदाचित नवीन वाटत असेल. जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता जे करतो तेच या निवडणुकीत करत आहे वेगळं काहीच नाही.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपमध्ये नाराज कोणीच नाही. संजय काकडे पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत. संजय काकडे यांच्यावर कोणी नाराज नाही. कोणावरही शंका व्यक्त करणे योग्य नाही. तर गिरीश बापट हे देखील नाराज नाही. ते आमचे नेते आहेत. आता ते आजारी आहेत. बेडवर असल्याने ते प्रचाराला येऊ शकत नाही. मात्र,  बापट यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.

Tags

follow us