Download App

Chandrashekhar Bavankule : सत्यजित तांबेंना ऑफर देणार नाही, यायचे असेल तर ते येतील

पुणे : नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील. सत्यजित तांबे यांनीच आता निर्णय घ्यावा. कारण आम्ही कुठलीही ऑफर त्यांना देणार नाही, असे स्पष्ट करत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी आम्ही कोणाची घरं फोडत नाही. त्यांनी घरं चांगली ठेवायला पाहिजे. आमची घरं सिमेंटची आहेत. त्यांची मात्र मातीचे घरं आहेत, असा टोला काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना लगावला.

पुणे दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माध्यमांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमची सत्यजित तांबे यांना कोणत्याही प्रकारची फूस नाही. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला, हे आधी काँग्रेसने तपासून पाहावे. मग दुसऱ्याला नावे ठेवावे.

तसेच आम्ही सत्यजित तांबे यांना आमच्याकडे या, म्हणून कोणतीही ऑफर दिलेली नाही. पदवीधर निवडणुकीत तांबे यांना प्रदेश भाजप स्तरावरुन कोणत्याही प्रकारे पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. तर आम्ह स्थानिक पातळीवर पाठिंब्याचा अथवा मदतीचा अधिकार दिला होता. त्यानुसार कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन मदत केली असेल, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags

follow us