Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस (Congress) फोडा आणि पक्ष खाली करा असा कानमंत्र दिला होता. बावनकुळेंच्या या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विरोधकांनी बावनकुळेंच्या विधानाचा जोरदार समाचार घेतला. त्यावर आता बावनुकळेंनी स्पष्टीकरण दिलं.
तुम्हाला जमीन द्यायची नाही, पण सरकारला हवीये, हट्ट सोडा, 7 दिवसांत….; बावनकुळे काय म्हणाले?
चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्यात माध्यमांसी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. कालच्या वक्तव्याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, मी असं म्हटलं, रविंद्र धंगेकर हे निष्ठावान कार्यकर्ते होते, आता ते एकनाथ शिंदे याच्याकडे गेले. परवा संग्राम थोपटे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. विदर्भ अन् मराठवाड्याील अनेक नेते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये येत आहेत. काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता फार अस्वस्थ आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे कोणतेही विकासेच व्हीजन नाही. देशाला पुढं घेण्यासाठी कोणती भूमिका त्यांच्याकडे नाही. केवळ नॅरेटीव्हवर काम करून पक्ष वाढत नसतो, असं ते म्हणाले.
तुम्हाला जमीन द्यायची नाही, पण सरकारला हवीये, हट्ट सोडा, 7 दिवसांत….; बावनकुळे काय म्हणाले?
राज्यातील नेतृत्वही पक्षाला पुढे नेण्यासाठी कुठली भूमिका घेतांना दिसत नाही. आजवर कॉंग्रेसने फक्त ईव्हीएमला दोष देऊन पार्टी चालवली. काँग्रेस पक्षामध्ये ज्याला वाटतं की विकासाच्या प्रवाहात यायचंय, त्यांना भाजपची दारं खुली आलेत, असं मी म्हणालो. मात्र, माझ्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास होतोय, असं बावनुकळेंनी सांगितलं.
पुरंदर विमानतळाबाबत बावनकुळे काय म्हणाले?
शेतकऱ्यांची पुरंदर विमानतळात जागा द्यायची नाही, अशी भूमिका आहे. पण, पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. तुम्हाला जमीन द्यायची नाही पण सरकारला हवी. त्यामुळं मी शेतकऱ्यांना विनंती करतो की, तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्ही सात दिवसांच्या आत सांगा. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचं नाही. पण, विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट शेतकऱ्यांनी सोडावा, असं बावनकुळे म्हणाले.