आतली बातमी फुटली, विजय निकम झाले ‘टायगर भाई’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Aatali Bayami Phutali, Vijay Nikam has become ‘Tiger Bhai’; The film will be released soon : अभिनेते विजय निकम यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चर्चेचे कारणही तसंच आहे. ‘वीजी फिल्म्स’च्या ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात एका भाईची भूमिका ते साकारणार आहेत. ‘टायगरभाई’ असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांचा ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.
डॉ. वळसंगकर प्रकरणात ट्विस्ट, संशयित सून डॉ. शोनाली गायब, वडिलांसह परदेशात गेल्याच्या चर्चा
मी साकारलेला ‘टायगरभाई’ हा चित्रपटात खूपच धमाल करताना दिसणार आहे. भूमिका ग्रे शेडची असली तरी माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे सोबत त्यात विनोदी बाज असल्याने ही भूमिका करायला मजा आली. मला ‘टायगरभाई’ च्या भूमिकेत पाहणं चाहत्यांना सुद्धा आवडेल यात शंका नाही. एका खूनाच्या सुपारीच्या रहस्यभेदा भोवती ‘आतली बातमी फुटली’ या सिनेमाची कथा फिरते. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकार या चित्रपटात धमाल उडवणार आहेत.
VIDEO : प्रशासन झोपलंय का? अवैध वाळू तस्करांचा पाठलाग करत आमदार अमोल खताळ यांची धडक कारवाई
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सह निर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत. चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी, जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांची आहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे, व अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओजने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.