Download App

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 14वी ‘भारतीय छात्र संसद’ चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

CM Devendra Fadnavis :  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT World Peace University), पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis :  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT World Peace University), पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय 14 वीं ‘भारतीय छात्र संसद’  8 ते 10 फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. सन 2011 पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून छात्र संसदेचे हे 14 वे वर्ष आहे. अशी माहिती  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी कर्टन रेझर पत्रकार परिषदेत दिली.

14 व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन, शनिवार, 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, राजस्थान विधान परिषदेचे माजी सभापती डॉ.सी.पी. जोशी आणि सीएमओ बीओएटीचे सह संस्थापक अमन गुप्ता हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या छात्र संसदेमध्ये 4 सत्रे आयोजित केली गेली आहेतः

पहिले सत्रः शनिवार दि. 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.00 वाजता सुरू होणार आहे. ‘भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर’ या विषयावर हिमाचल प्रदेश विधानसभेचे सभापती कुलदिपसिंह पठानिया, एनएसयुचे प्रमुख डॉ. कन्हैया कुमार, माजी खासदार अ‍ॅड.ए.ए.रहिम, खासदार राजकुमार रौत हे आपले विचार मांडतील. विद्यार्थ्यांसाठी दुपारी 4.15 वा. ‘युथ टू युथ कनेक्ट’ हे विशेष सत्र होईल.

दूसरे सत्र : रविवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वाजता सुरू होणार आहे. ‘रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार’ या विषयावर झारखंड विधानसभेचे सभापती रवींद्र नाथ महातो हे अध्यक्षस्थानी असतील. प्रसिद्धी टिव्ही जर्नालिस्ट रुबिका लायक्वत, कॉग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरूण चुघ, खासदार रणजीत रंजन हे विचार मांडतील.

तिसरे सत्र :  रविवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.45 वा. सुरू होणार आहे. ‘भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर : भारतीय युवकांची कोंडी’ या विषयावर बिहार विधानसभेचे अध्यक्ष नंद किशोर यादव हे विचार मांडतील.या वेळी सिव्हिल एव्हिएशन मंत्री राम मोहन नायडू किंजीरापू यांना भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर व लोकसभा सदस्य अरूण गोविल हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी दुपारी 3 ते 5 या कालावधीत ‘युथ टू युथ कनेक्ट’ या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर संध्याकाळी 7.30 मिनीटांनी ‘लोकतंत्र का रंगमंच’ ह्या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल.

चौथे सत्र :  सोमवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.00 वा. सुरू होणार आहे. ‘एआय आणि सोशल मिडिया : सामर्थ्य की अनपेक्षित संकट’ या विषयावर मेघालय विधानसभेचे सभापती थॉमस ए. संगमा, वरिष्ठ पत्रकार राजेश बादल, टीव्ही 9 नेटवर्क चे कार्यकारी संपादक आदित्यराज कौल व आयटेकचे व्यवस्थापकीय संचालक असिम पाटील हे आपले विचार मांडणार आहेत. तसेच सोमवार, 10 फेब्रुवारी 2025  रोजी दुपारी 11.45 वा. होणार्‍या समारोप प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित राहणार आहेत.

जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे या छात्रसंसदेचे मार्गदर्शक आहेत. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे.

नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद आणि भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे. सविस्तर माहितीसाठी www.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावे. आमदारांसाठी ‘नेतृत्व क्षमता संवर्धन कार्यक्रम’ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने आमदारांकरीता ‘नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रम’ 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे.

या परिषदेत देशातील जवळपास 250 आमदारांनी उपस्थित राहण्याची संमती दर्शविली आहे. या वर्षी आयोजित नेतृत्व क्षमता संर्वधन कार्यक्रमात’ सहभागी सर्व आमदार हे भारतीय छात्र संसद मध्ये सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. येथे आमदारांसाठी सुद्धा विशेष 3 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सत्र 1 : रोजगाराचे मार्ग मतदारसंघात निर्मिती

सत्र 2 : कायदेकर्त्या आणि नोकरशहाः विकासाचे एजंट

सत्र 3 : धोरणात्मक संवादः सोशल मीडियाचा प्रभावी वापर

SL vs AUS:  स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, मोडला रिकी पॉन्टिंगचा खास विक्रम

अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे  प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डाॅ. मुकेश शर्मा, प्रा. डॉ. परिमल माया सुधाकर, डाॅ. हितेश जोशी, डाॅ. अंजली साने, डाॅ. पौर्णिमा इनामदार, प्रा. गोपाळ वामने, एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टूडेन्ट कॉन्सिलचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, उपाध्यक्ष कु. अपूर्वा भेगडे व नितीश तिवारी उपस्थित होते.

follow us